शहरात पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:28 IST2020-08-10T23:47:11+5:302020-08-11T01:28:27+5:30

नाशिक : शहर व परिसरात सोमवारी (दि.१०) सायंकाळी पावसाच्या मध्यम सरींचा वर्षाव झाला. दिवसभर ढगाळ हवामान असल्याने वातावरणात उकाडा जाणवत होता. संध्याकाळी साडेसहा वाजता काही मिनिटे सरी कोसळल्याने हलकासा दिलासा मिळाला.

The presence of rain in the city | शहरात पावसाची हजेरी

शहरात पावसाची हजेरी

ठळक मुद्देमध्यम सरींचा वर्षाव : चाकरमान्यांची तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहर व परिसरात सोमवारी (दि.१०) सायंकाळी पावसाच्या मध्यम सरींचा वर्षाव झाला. दिवसभर ढगाळ हवामान असल्याने वातावरणात उकाडा जाणवत होता. संध्याकाळी साडेसहा वाजता काही मिनिटे सरी कोसळल्याने हलकासा दिलासा मिळाला.
पावसाने यंदा दडी मारली असून, शहरात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही. आगॅस्ट महिन्याचे दहा दिवस उलटले असले तरी अद्याप गोदावरी या हंगामात दुथडी भरून वाहताना नजरेस पडलेली नाही. गेल्या वर्षी गोदावरीला महापूर याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आला होता. यावर्षी पावसाने निराशा केली आहे. सोमवारी संध्याकाळी मध्यम सरींनी नाशिककरांना ओलेचिंब भिजविले. संध्याकाळी अचानकपणे आलेल्या सरींमुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. कॉलेजरोड, गंगापूररोड, अशोकस्तंभ, रविवारकारंजा, पंचवटी, मुंबईनाका, शरणपूररोड, अशोकामार्ग, डीजीपीनगर, वडाळागाव, इंदिरानगर, सिडको या भांगात सुद्धा पावसाने हजेरी लावली. उपनगरांमध्ये रात्री ८ वाजता पावसाला दमदार सुरुवात झाली. तोपर्यंत शहरातील मध्यवर्ती भागातसुद्धा सरींचा जोर टिकून होता. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात सरींचा शिडकावा झालेला नव्हता; मात्र ६ वाजेनंतर शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरीय भागांतसुद्धा पावसाने सलामी लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पावसाच्या मध्यम सरींचा वर्षांव झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

Web Title: The presence of rain in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.