नाशिक : ‘हायप्रोफाइल’ ज्योतिषी अशोक खरात याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर खरात याने सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिरासह स्थापन केलेले शिवनिका संस्थान ट्रस्टही चर्चेत आले आहे. या मंदिराला अनेक राजकीय नेत्यांनी भेटी देतानाच ट्रस्टवर राजकीय क्षेत्रातील मातब्बरांची वर्णी लावलेली असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
कॅप्टन अशोक खरात याने सुमारे १७ वर्षांपूर्वी सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात श्री ईशान्येश्वर मंदिराची अंकशास्त्राच्या आधारे नदीच्या ईशान्य कोपऱ्यात उभारणी केली. यासाठी शिवनिका संस्थान नावाने ट्रस्ट निर्माण करून त्यावर राज्यातील मातब्बर लोकांची वर्णी लावली. तेव्हापासून खरात अधिक चर्चेत आले. ईशान्येश्वर मंदिराची उभारणी केल्यानंतर शिर्डीला येणारे अनेक भाविक सिन्नर-शिर्डी रस्त्याच्या कडेला मिरगाव शिवारात असलेल्या मंदिरात दर्शनासाठी येऊ लागले होते. यात अनेक बडे राजकारणी, उद्योजक व कलाकारांचा समावेश होता. देश, विदेशातून खरात यांचे शिष्य या मंदिरात पूजेसाठी येत होते.
२ वर्षांपूर्वी ट्रस्टमध्ये बदलशिवनिका ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर तालुक्यातील व काही बाहेर जिल्ह्यातील प्रतिष्ठित या ट्रस्टचे संचालक होते. मात्र दोन वर्षापूर्वी तीन ट्रस्टींनी पदाचे राजीनामे दिले होते. नवीन ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. त्यावर खरात यांच्या पत्नी यांना सरचिटणीस बनविण्यात आले होते.
श्रावणात, गुरुपौर्णिमेला चाकणकरांची उपस्थितीस्वयंघोषित कॅप्टन अशोककुमार यांनी स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थान, मिरगाव या संस्थानवर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या ट्रस्टी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक कार्यक्रम, महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमांना व गुरूपौर्णिमेला चाकणकर या उपस्थित असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
संचालक मंडळाच्या नावांचा फलक गायब...मंदिराच्या सभामंडपात श्री शिवनिका संस्थानच्या संचालक मंडळाच्या नावाचा फलक लावलेला होता. मात्र खरातवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रातोरात फलक गायब झाल्याची चर्चा होती.
अशोक कुमार खरात हे ब्रह्मांडशास्त्रज्ञ असल्याचे सांगितले जात होते. त्यांचा अंकशास्त्राचा अभ्यास असून प्रख्यात ज्योतिषी असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे नाशिक येथील त्यांच्या कार्यालयात भविष्य पाहण्यासाठी बडे राजकारणी, उद्योजक, सेलिब्रिटी यांचा वावर असायचा.
सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात श्री ईशान्येश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस खरात यांचा अलिशान बंगला आणि शेती आहे. याठिकाणी आंब्याची बाग लावण्यात आली असून समोर श्री शिवनिका संस्थानचा मोठा सभामंडप बांधण्यात आला आहे. याठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात.
कॅप्टन खरात अटकेनंतर रूपाली चाकणकर विरोधकांच्या रडारवर
हे एका हायप्रोफाइल शोषण रॅकेटचा पर्दाफाश आहे. पोलिसांनी ५८ अश्लील व्हिडीओ जप्त केले. त्यात प्रभावशाली वर्तुळातील महिलांसह अनेकांचा समावेश असल्याचे म्हटले जाते. बंद दाराआड महिलांचे शोषण करत असताना, त्याचे संरक्षण कोणी केले? त्या व्हिडीओमध्ये आणखी कोण आहे?संजय राऊत, खासदार, उद्धवसेना
वैयक्तिक श्रद्धा प्रत्येकाची असू शकते; पण संविधानिक पदावर असताना त्या श्रद्धेची मर्यादा पाळलीच पाहिजे. जबाबदारीच्या पदावर असणाऱ्यांनी विवेक आणि संवेदनशीलता दाखवणे अपेक्षित आहे. चित्रा वाघ, भाजप नेत्या
सत्तेच्या जवळिकीमुळे आंधळा विश्वास निर्माण होतो, त्यामुळे यंत्रणा मूक होऊन अत्याचाराला खतपाणी मिळते. खरातला संरक्षण कोणी दिले? आणि त्या व्हिडीओंमध्ये अजून कोण आहे?विजय कुंभार, भ्रष्टाचारविरोधी चळवळीतील कार्यकर्ते
चाकणकरांना या पदावर राष्ट्रवादी ठेवणार का?यापूर्वीसुद्धा अशोक खरात याच्यावर जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेने केले तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता. विशेष म्हणजे खरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर संचालक म्हणून काम करतात. महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रूपाली चाकणकर यांनी अशा माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार? राष्ट्रवादी चाकणकरांना या पदावर ठेवणार का?सुषमा अंधारे, उद्धवसेना प्रवक्त्या
Web Summary : Astrologer Ashok Kharat's arrest has brought his temple and trust under scrutiny due to political ties. Rupali Chakankar's involvement as a trustee raises questions. Opposition leaders demand answers regarding protection and potential abuse within the trust.
Web Summary : ज्योतिषी अशोक खरात की गिरफ्तारी के बाद राजनीतिक संबंधों के कारण उनका मंदिर और ट्रस्ट जांच के दायरे में आ गया है। रूपाली चाकणकर की ट्रस्टी के रूप में भागीदारी सवाल उठाती है। विपक्षी नेता ट्रस्ट के भीतर सुरक्षा और संभावित दुरुपयोग के बारे में जवाब मांग रहे हैं।