इगतपुरी तालुक्यात दमदार पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 00:35 IST2021-07-19T23:05:49+5:302021-07-20T00:35:47+5:30
इगतपुरी : गेल्या दोन दिवसापासुन शहरासह व कसाराघाट व पश्चिम घाटमाथ्याच्या परिसरासह तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्याचे मुख्य भातपिकाला दिलासा मिळाला आहे, तर आवणीला वेग आला आहे.

इगतपुरी तालुक्यात दमदार पावसाची हजेरी
इगतपुरी : गेल्या दोन दिवसापासुन शहरासह व कसाराघाट व पश्चिम घाटमाथ्याच्या परिसरासह तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्याचे मुख्य भातपिकाला दिलासा मिळाला आहे, तर आवणीला वेग आला आहे.
गेल्या चोवीस तासात विक्रमी अशी २२२ मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे रविवारी (दि.१८) पावसाने सायंकाळपासुन चांगलाच जोर धरल्याने धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे.
इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम व खेड्याच्या भागात पाऊसाने सर्वत्र जोरदार मुसंडी मारली असुन घाटमाथ्यावरील इगतपुरी, भावली, मानवेढे, काळूस्ते, वैतारणा पट्यात जोराचा पाऊस असल्याने या परिसरातील शेतातला काही भाग जलमय झाला असुन भात शेतीला हा पाऊस पुरक असल्याचे चित्र दिसुन येत आहे .
गेल्या दोन दिवस सुरू असलेल्या या पावसामुळे शहरातील भाजी विक्रेते व लहान लहान व्यापाऱ्यांचे चांगलेच हाल झाले. तर अनेकांची धावपळ झाली. दरम्यान या पावसामुळे इगतपुरी तालुक्यात एकूण ११२३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.