पावसाळापूर्व वस्तू साठवणुकीची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 00:12 IST2021-06-02T20:28:03+5:302021-06-03T00:12:08+5:30
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक शहरात पावसाळापूर्व नियमित लागणाऱ्या वस्तूंच्या साठवणुकीची प्रक्रिया सध्या जोरात सुरू आहे. यामध्ये दररोज लागणाऱ्या वस्तूंचा पावासाळ्यातील ...

पावसाळापूर्व वस्तू साठवणुकीची तयारी
ठळक मुद्देचार महिन्यांसाठी आवश्यक तो साठा करून ठेवण्यात येतो.
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक शहरात पावसाळापूर्व नियमित लागणाऱ्या वस्तूंच्या साठवणुकीची प्रक्रिया सध्या जोरात सुरू आहे. यामध्ये दररोज लागणाऱ्या वस्तूंचा पावासाळ्यातील चार महिन्यांसाठी आवश्यक तो साठा करून ठेवण्यात येतो.
पावसाळ्यात घराबाहेर पडणे अशक्य असल्याचा अनुभव कायम असल्याने उन्हाळ्यातच महिलावर्ग तांदळाचे पापड, वडे, कुरड्या, पापड, चकली तसेच दळण व वेगवेगळ्या मिरच्या मसाले याशिवाय कांदा, लसूण, किराणा, लोणची आदी मालाचा अगोदरच साठा करून ठेवतात.