‘नामको’ची निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:12 AM2018-12-20T00:12:39+5:302018-12-20T00:13:03+5:30

नाशिक मर्चंट को आॅप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्याने प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली असून, मतदानासाठी एकूण ३१० बूथची व्यवस्था करण्यात आली आहे.

 Preparing the election of 'Namko' in the final phase | ‘नामको’ची निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात

‘नामको’ची निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात

Next

सातपूर : नाशिक मर्चंट को आॅप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्याने प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली असून, मतदानासाठी एकूण ३१० बूथची व्यवस्था करण्यात आली आहे.  नाशिक मर्चंट को आॅप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्रगती, सहकार आणि नम्रता असे तीन पॅनल तयार झाले असून, २१ जागांसाठी ८२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तिन्ही पॅनलच्या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार सुरू केला आहे. मल्टी शेड्यूल बँक असल्याने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आणि परराज्यातही बँकेच्या शाखा असून, मतदारही विखुरलेले आहेत. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागत आहे.
संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. शहराबरोबरच जिल्ह्यात, परजिल्ह्यात आणि परराज्यातील मतदारांसाठी मतदानाची चोख व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद भालेराव यांनी दिली आहे. सहायक म्हणून सर्जेराव कांदळकर, जयेश आहेर, दिगंबर अवसारे काम पहात आहेत.
अद्याप तक्रार नाही
निवडणूक प्रक्रियेत तिन्ही पॅनलच्या उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असले तरी निवडणूक अधिकाºयांकडे अद्यापपर्यंत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.  एका पॅनलकडून स्व. हुकूमचंद बागमार यांचे छायाचित्र वापरण्यास निवडणूक अधिकाºयांकडे हरकत नोंदविण्यात आली होती. परंतु ही हरकत निवडणूक अधिकाºयांनी फेटाळून लावली आहे.

Web Title:  Preparing the election of 'Namko' in the final phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.