रेशनवर अतिरिक्त मोफत धान्य देण्याची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:18 IST2021-04-30T04:18:20+5:302021-04-30T04:18:20+5:30

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याला अटकाव घालण्यासाठी महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्यात आल्यामुळे राज्यातील गरीब आणि सर्वसामान्य जनतेला ...

Prepared to give extra free grain on ration | रेशनवर अतिरिक्त मोफत धान्य देण्याची तयारी पूर्ण

रेशनवर अतिरिक्त मोफत धान्य देण्याची तयारी पूर्ण

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याला अटकाव घालण्यासाठी महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्यात आल्यामुळे राज्यातील गरीब आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी तसेच हे कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी महाराष्ट्राला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची पुन्हा एकदा गरज असल्याची मागणी करण्यात आली होती.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी सध्या १.४० लाख मेट्रिक टन तांदळाची तर २.४० लाख मेट्रिक टन गव्हाची गरज असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी असलेल्या राज्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

-------

कुटुंबाला लागणार मोठा हातभार

गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे मोठी आर्थिक परिस्थीती निर्माण झाली असून, त्याचा रोजगारावर परिणाम झाला आहे. कधी काम मिळते तर कधी नाही त्यामुळे सरकारच्या योजनेवरच अवलंबून राहावे लागते.

- सोमनाथ गांगोडे

--------------

शासनाच्या या योजनेचा गेल्या वर्षीही लाभ झाला. लॉकडाऊनच्या काळात कामधंदा बंद पडल्याने तेव्हा रेशन दुकानातून मिळणाऱ्या मोफत धान्यावरच कुटुंबाची गुजराण झाली. आताही शासनाने निर्णय घेवून गोरगरिबांना मोठा दिलासा दिला आहे.

- पुंडलिक पवार

-----------

अन्न सुरक्षा योजनेंतर्गत दरमहाच कमी दरात रेशनमधून धान्य मिळत असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला मदत होत आहे. आता अतिरिक्त धान्य दोन महिन्यांसाठी मिळणार असल्याने त्याचा आमच्यासारख्या लाखो कुटुंबीयांना लाभ होणार आहे.

- सखूबाई देवरे

-----------------------

एकूण रेशनकार्डधारकांची संख्या-

रेशनकार्डचा प्रकार - रेशनकार्डधारकांची संख्या

अंत्योदय- १,८१,५९४

प्राधान्य कुटुंब - ३०,४३,५९१

-----------

मोफत धान्य काय मिळणार?

शासनाकडून प्रती माणसी पाच किलो अतिरिक्त धान्य दिले जाणार आहे. त्यात तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे.

-----------

धान्याचा साठा मुबलक

जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी आवश्यक असलेला धान्याचा साठा उपलब्ध आहे. मे व जून महिन्यात त्याचे वाटप केले जाणार असल्याने मे महिन्यात त्याचे वाटप सुरू होईल.

- कैलास पवार, सहायक पुरवठा अधिकारी

Web Title: Prepared to give extra free grain on ration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.