कपालेश्वर मंदिराला वज्रलेप करण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST2021-02-05T05:40:54+5:302021-02-05T05:40:54+5:30
रामकुंडावरील कपालेश्वर मंदिरातील मुख्य मूळ पिंडीवर रोज दुग्धाभिषेक होत असल्याने पिंडीची झीज होते हे निदर्शनास आले होते. शिवपिंडीची होणारी ...

कपालेश्वर मंदिराला वज्रलेप करण्याची तयारी
रामकुंडावरील कपालेश्वर मंदिरातील मुख्य मूळ पिंडीवर रोज दुग्धाभिषेक होत असल्याने पिंडीची झीज होते हे निदर्शनास आले होते. शिवपिंडीची होणारी झीज थांबविण्यासाठी भगवान महादेवाच्या पिंडीला वज्रलेप करण्याची मागणी मंदिर पुजारी व भाविकांनी केली होती. पिंडीवर वज्रलेप करण्यासाठी मंदिर विश्वस्तांनी काशी धर्मपीठाकडे पाच महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार श्री गिर्वाण वाग्वर्धिनी सभा गणेश्वरशास्त्री द्राविड यांनी काही दिवसांपूर्वी कपालेश्वर मंदिराला भेट देत कपालेश्वर मंदिरात असलेल्या पिंडीचे निरीक्षण करून माहिती घेत शिव पिंडीची झीज भरून काढण्यासाठी व शिवपिंड संवर्धनासाठी वज्रलेप करण्यास अनुमती दिली. वज्रलेप करण्यासाठी जाणकारांच्या मदतीने करण्याचे सुचविले. तसेच आगामी काळात मंदिर संस्थानतर्फे महादेव पिंडीला वज्रलेप कामासह सध्या पिंडीला लावलेला चांदीचा पत्रा काढून फ्लोअरचे काम करण्यात येणार आहे. सदर कामासाठी एक समिती गठीत केली असून, कामाला आगामी काळात प्रारंभ केला जाणार असल्याचे विश्वस्तांनी सांगितले.