शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

सिन्नर येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 16:56 IST

सिन्नर : येथील आडवा फाटा मैदानावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. (दि. ३१ ) पासून कबड्डी स्पर्धेस प्रारंभ होत आहे. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी सिन्नरच्या वंजारी समाज मैदानावर जोरदार तयारी करण्यात आली असून स्पर्धेसाठी सिन्नर शहर व तालुका सज्ज झाला आहे.

ठळक मुद्दे६६ वी वरिष्ठ गट पुरूष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा ३१ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत सिन्नर येथील आडवा फाटा मैदानावर होणार आहे

सिन्नर : येथील आडवा फाटा मैदानावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. (दि. ३१ ) पासून कबड्डी स्पर्धेस प्रारंभ होत आहे. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी सिन्नरच्या वंजारी समाज मैदानावर जोरदार तयारी करण्यात आली असून स्पर्धेसाठी सिन्नर शहर व तालुका सज्ज झाला आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने नाशिक जिल्हा परिषद व सह्याद्री युवा मंच, सिन्नर यांच्या सौजन्याने ६६ वी वरिष्ठ गट पुरूष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा ३१ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत सिन्नर येथील आडवा फाटा मैदानावर होणार आहे.नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे व सह्याद्री युवा मंच, सिन्नर या संस्थेच्या वतीने या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ही पाच दिवस चालणार आहे. त्यासाठी मैदानाची तयारी व आसनव्यवस्था करण्यात येत आहे. मैदानावर एकाच वेळी सहा सामन्यांचा थरार रंगणार आहे. पाच दिवसात सुमारे ५० ते ६० हजार प्रेक्षकांची उपस्थिती राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.आसनव्यवस्थेच्या मधोमध स्पर्धेसाठी मातीची सहा मैदाने असणार आहेत. या मैदानांत एकाच वेळी कबड्डीच्या सहा स्पर्धा होणार आहेत. प्रेक्षक गॅलरीचे काम अंतिम टप्प्यात आले असून प्रवेशद्वारावर मोठी कमान उभारण्यात येत आहे. प्रेक्षक गॅलरीसह भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. दिवसरात्र सत्रात होणाऱ्या स्पर्धेसाठी दररोज १० हजार प्रेक्षक हजेरी लावण्याची शक्यता आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडुंच्या सहभाग असलेल्या कबड्डीचा थरार रिप्लेसह बघता यावा यासाठी मोठया स्क्र ीनची देखील व्यवस्था करण्यात येणार असून या सर्व कामांनी सद्या वेग घेतला आहे.यास्पर्धेत राज्यातून पुरूषांचे २५ तर महिलांचे २० संघ सहभागी होणार आहेत. जवळपास ५४० पुरूष व महिला खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तसेच राज्यभरातून ७० पंच स्पर्धेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. या मैदानांवर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेतून निवडला जाणारा पुरूष व महिला संघ ६६ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.चौकट - स्पर्धेसाठी उभारण्यात येणाºया क्रीडा नगरीची तयारी सुरू झाली असून सुसज्ज असे स्टेडीयम आडवा फाटा मैदानावर साकारण्यात येत आहे. या स्पर्धा एकुण सहा मैदानांवर पार पडणार असून त्यासाठी सहा कबड्डी मैदानांची जय्यत तयारी सुरू आहे. प्रेक्षक गॅलरी, विशेष अतिथी साठीची प्रेक्षक गॅलरी, मुख्य स्टेजची उभारणी सुरू असून मैदानाला तीन मुख्य प्रवेशद्वार उभारण्यात येत आहेत.चौकट -सांस्कृतीक कार्यक्र ामांची मेजवणीया कबड्डी स्पर्धांच्या माध्यमातून सिन्नरकरांना खेळासोबतच मनोरंजनाचा देखील लाभ मिळणार आहे. त्यासाठी भव्य स्टेजची उभारणी करण्यात असून १ नोव्हेंवर रोजी ‘चला हवा येउ द्या’ फेम भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा कार्यक्र म तसेच २ व ३ नोव्हेंबरला नाशिक जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांचे विविध सांस्कृतीक कार्यक्रम यावेळी पार पडणार आहेत.