Preparation review meeting for Kharif in Wadad | वाकद येथे खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक

वाकद येथे खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक

देवगाव : निफाड तालुक्यातील वाकद येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाली. तालुका कृषी अधिकारी बी.जी.पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पूर्व मशागत करतांना खोल नांगरट करावी, पीक फेरपालट, सोयाबीन तसेच मका बियाणे कोणते वापरावे , बियाण्याची उगवण शक्ती कशी तपासावी याविषयी शेतकऱ्यांना अतिशय सोप्या भाषेत समाजावुन सर्व उगवण शक्ती तपासल्यानंतरच पेरणी करावी असे आवाहन केले. शेतकºयांनीही त्यांना प्रतिसाद देऊन पेरणीपूर्वी या पद्धतीचा अवलंब करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळि यावर उपाययोजना सांगितल्या. दुष्काळी परिस्थितीत फळबागा कशा वाचवाव्यात पाण्याची बचत कशी करावी तसेच जैविक आच्छादन कसे करावे याविषयी प्रात्यक्षिक करून दाखवले.  मंडळ कृषी अधिकारी दिपक सोमवंशी यांनी माती परीक्षणाचे महत्व समजून सांगितले.त्यामध्ये रासायनिक खतांचा संतुलित वापर याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच कृषी सहाय्यक आर.एन.साठे यांनी शेतक-यांना बिजप्रक्रि येचे महत्त्व आणि बीज प्रक्रि या कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्र मासाठी तालुका कृषी अधिकारी बी.जी.पाटील, मंडल कृषी अधिकारी दिपक सोमवंशी ,कृषी पर्यवेक्षक के. डी.मद्रेवार व कृषी सहायक आर. एन.साठे तसेच रमेश बडवर, दिलीप लिप्टे,सतिष पाटिल,राजेंद्र पाटील, शिवाजी बडवर, संजय खैरनार, राहुल बडवर, सोमनाथ गोसावी सुनील गायकवाड आदि शेतकरी बांधव उपस्थित होते.

Web Title: Preparation review meeting for Kharif in Wadad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.