Preliminary selection of 3 candidates for employment fair | रोजगार मेळाव्यात १२६ उमेदवारांची प्राथमिक निवड
रोजगार मेळाव्यात १२६ उमेदवारांची प्राथमिक निवड

ठळक मुद्देरोजगार व उद्योजकता मेळाव्यास 256 उमेदवारांचा प्रतिसादवेगवेगळ्या संस्थांकडून १२६ उमेदवारांची प्राथमिक निवड

नाशिक : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कें द्र, नाशिक व  मराठा विद्याप्रसारक समाजाचे के.टी.एच.एम. कॉलेज, गंगापूर रोड, नाशिक यांच्यातर्फे संयुक्तरीत्या घेण्यात आलेल्या रोजगार व उद्योजकता मेळाव्यात १० नियोक्ता संस्थांनी सुमारे १२६ उमेदवारांची प्राथमिक निवड केली आहे. 
केटीएचएम महाविद्यालयात विविध अस्थापनांमधील २९३ रिक्त जागांसाठी रविवारी (दि.८)  घेण्यात आलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व उद्योजकता मेळाव्यात १० नियोक्त्यांनी १२६ उमेदवारांची प्राथमिक निवड केली. या मेळाव्यासाठी २५६ उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून रोजगार प्राप्तीसाठी मुलाखती दिल्या. शासनाने एकाच व्यासपीठावर नियोक्ते, रोजगार इच्छुक युवक-युवती यांना एकत्र आणून संधी उपलब्ध करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला असून, याचा लाभ तरुणांनी घ्यावा आणि आपली प्रगती करावी, असे आवाहन उपसंचालक सुनील सैंदाणे यांनी यावेळी केले. तरुणांनी उपलब्ध रोजगार संधीचा लाभ घेणे आवश्यक असून मोठे यश प्राप्त करण्यासाठी प्रथम मिळेल ती नोकरी स्वीकारणे गरजेचे आहे. कौशल्य आणि अनुभव प्राप्त करूनच करियर घडते असे मार्गदर्शन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी संदीप गायकवाड यांनी केले. याप्रसंगी करिअर टाटा स्टाइव्ह सह्याद्री फार्मचे महेश तकाटे यांनी दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेबाबत आणि प्रकाश घुगे यांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाºया मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व इतर  योजनांची माहिती दिली. सुभदा पाठक यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: Preliminary selection of 3 candidates for employment fair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.