घरगुती गणेशमूर्ती तयार करण्यास प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 01:07 IST2020-08-17T21:06:47+5:302020-08-18T01:07:11+5:30
सवतीर्थ टाकेद : कोरोनाच्या सावटाखाली इगतपुरी तालुक्यातील घोटीसह ग्रामीण भागातील गणपती मूर्ती तयार करणाऱ्या छोट्या कारखानदारांचे आर्थिक नियोजन चालूवर्षी पूर्णपणे कोलमडले आहे.

घरगुती गणेशमूर्ती तयार करण्यास प्राधान्य
लोकमत न्यूज नेटवर्क
सवतीर्थ टाकेद : कोरोनाच्या सावटाखाली इगतपुरी तालुक्यातील घोटीसह ग्रामीण भागातील गणपती मूर्ती तयार करणाऱ्या छोट्या कारखानदारांचे आर्थिक नियोजन चालूवर्षी पूर्णपणे कोलमडले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी केवळ तीस टक्केच गणेशमूर्र्ती कला केंद्रात तयार केल्या असल्या तरी केवळ घरगुती वापराच्या गणेशमूर्तीच बुक होत असून, तीन ते चार फुटांच्या मूर्तींना अद्यापही मागणी नाही. तालुक्यातील आदिवासी भागाचे मुख्य केंद्र म्हणून घोटी, टाकेद बाजारपेठेची ओळख आहे. घोटी येथील पेंटर गणेशमूर्ती कलाकार अनिल रसाळ व टाकेद येथील गणेशमूर्ती व्यावसायिक जाधव बंधूंनी पारंपरिक व्यवसायांना फाटा देत मागील दहा पंधरा वर्षांपूर्वी गणेशमूर्ती बनविण्याचा व विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला.
आकर्षक मूर्ती बनविल्या जात असल्याकारणाने तालुक्यातील विविध गावात त्यांच्या मूर्तींना चांगली मागणी वाढत चालली होती. या दोन्ही ठिकाणी छोट्या मूर्तीपासून ते मोठ्या साडेसात फूट उंचीच्या सुमारे एक ते दीड हजार मूर्र्ती याठिकाणी रंगरंगोटी करून डिझायनिंग करून बनविल्या जात होत्या. एरवी आतापर्यंत परिसरातील सार्वजनिक मंडळे गणेशमूर्तीचाी बुकिंग करण्यासाठी अगोदरच गर्दी करत असत मात्र यावर्षी बोटावर मोजता येण्या सारख्या मूर्तींची बुकिंग आतापर्यंत झाली असल्याचे दिसून येत आहे.गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून आमचे कुटुंब मातीचे व प्लॅस्टर आॅफ पॅरिसचे बैल, गणेशमूर्ती, नवरात्र उत्सवासाठी देवीच्या मूर्ती, दीपावलीत लक्ष्मीच्या मूर्ती बनवत असतो. दरवर्षी हजारोंच्या संख्येने लहान-मोठ्या मूर्ती बनवून मूर्तींना उत्कृष्ट डेकोरेशन, रंगरंगोटी, डिझायनिंग करून तयार करत असतो. त्याचा कुटुंबास मोठा हातभार लागत असतो; परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चालूवर्षी मूर्तींची मागणी घटली आहे.
- अनिल रसाळ, पेंटर, मूर्तिकार, घोटीदरवर्र्षी गणेशोत्सवात परिसरातील गणेश मंडळ एक महिना अगोदरच गणेशमूर्र्ती बुक करून ठेवतात. परंतु यंदा सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने गणपती उत्सव तोंडावर आलेला असतानाही गणेशमूर्तींना मागणी नाही. ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावली असल्याने अद्याप बोटावर मोजण्याइतक्याच मूर्र्ती बुक झालेल्या आहेत.
- नंदू जाधव, गणेशमूर्ती व्यावसायिक, टाकेद