शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कॅशलेस व्यवहारांना पसंती ; मुळे एटीएम, बँकांमध्येही शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 19:43 IST

कोरोनाच्या प्रभावामुळे शहरात असलेला पोलिसांचा बंदोबस्त आणि सोशल मीडियावर पोलिसांकडून नागरिकांना होणाºया मारहाणीचे व्हिडीओ यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण असून, सामान्य नागरिक बँका अथवा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठीही घराबाहेर पडताना दिसून येत नाही. त्याचप्रमाणे एटीएम मशीनच्या माध्यमातून संसर्ग होण्याची भीतीही नागरिकांमध्ये असल्याने अनेकजण रोखीचे व्यवहार करण्याऐवजी कॅशलेस, आॅनलाइन व्यवहार करण्यास पसंती देत आहे.

ठळक मुद्देनागरिकांकडून कॅशलेस व्याहराकांना पसंती संसर्ग टाळण्यासाठी एटीएम. बँकांकडे ग्राहकांची पाठ

नाशिक : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतर नाशिक शहरातील सुरक्षा व्यवस्था पोलिसांनी अधिक वाढविली असून, रस्त्यावर कामाशिवाय उतरणाºया नागरिकांना कर्तव्यावर असलेले कर्मचारी पोलिसी खाक्या दाखवत असल्याने शहरातील आर्थिक नस बनलेल्या बँका आणि एटीएममध्ये शुकशुकाट दिसून येत आहे.कोरोनाच्या प्रभावामुळे शहरात असलेला पोलिसांचा बंदोबस्त आणि सोशल मीडियावर पोलिसांकडून नागरिकांना होणाºया मारहाणीचे व्हिडीओ यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण असून, सामान्य नागरिक बँका अथवा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठीही घराबाहेर पडताना दिसून येत नाही. त्याचप्रमाणे एटीएम मशीनच्या माध्यमातून संसर्ग होण्याची भीतीही नागरिकांमध्ये असल्याने अनेकजण रोखीचे व्यवहार करण्याऐवजी कॅशलेस, आॅनलाइन व्यवहार करण्यास पसंती देत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांचे प्रमाण वाढल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. देशात ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर रोख स्वरूपात चलन टंचाई निर्माण झाल्याने अचानक मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार वाढले होते. त्यानंतर बाजारात चलन प्रवाह सुरळीत झाल्यानंतर हे प्रमाण सामान्य झाले होते. यात पुन्हा वाढ झाली आहे. शहरात कोणतीही आपत्ती असली तरी सुरुवातीला हाताशी काही पैसे असावे म्हणून सर्वसामान्य नागरिकांकडून एटीएम, बँकांमधून पैसे काढण्याची लगबग सुरू होते. परंतु, देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतरही नागरिकांकडून एटीएममधून पैसे काढण्यापेक्षा कॅशलेस व्यवहार करण्यावर भर दिला जात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असताना अनेक नागरिकांनी स्वत:हून एटीएममधून पैसे काढणे टाळण्यास सुरुवात केली आहे. एटीएममध्ये आर्थिक व्यवहार करण्यासाठी येणाºया-जाणाºया नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, प्रत्येकाचा स्पर्श मशीनला होत असतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेकजण एटीएमच्या माध्यमातून व्यवहार करणे टाळत आहे. पैसे काढण्यासाठी नेहमी ग्राहकांची गर्दी होणाºया शहरातील मध्यवर्ती भागातील एटीएममध्येही सध्या शुकशुकाट असून, कोणाकडूनही थेट नोटांच्या स्वरूपात रोख रक्कम घेण्याऐवजी मोबाइल अ‍ॅपचा वापर करणाºया ग्राहकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकbankबँकatmएटीएम