शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दोघांतील ‘तिसरे’च सोडवणार भाकीतांचे कोडे!

By किरण अग्रवाल | Updated: March 24, 2019 01:11 IST

प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवाºया घोषित झाल्याने लढतीचे चित्र स्पष्ट होऊ पाहात असले तरी, उमेदवारीतून डावलले गेलेल्यांची नाराजी प्रचारात शेवटपर्यंत टिकते का, यावरच कोणतेही वा कोणाचेही कोडे सोडवता येणे शक्य व्हावे. यातून बसणारा फटका तसा भलेही छोटा असेल; पण तो उपद्रवकारी राहण्याची प्राथमिक शक्यता नाकारता येऊ नये.

ठळक मुद्देपक्षीय उमेदवाऱ्या घोषित झाल्याने प्रचारास गतीमतविभाजनास पूरक ठरणाऱ्या नाराजीसारख्या घटकांची चर्चा लक्षवेधीविशेष वर्गसमूहाच्या एकगठ्ठा मतांचे ध्रुवीकरण होण्याचे प्राथमिक अंदाज

सारांशलोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांची व उमेदवारांची मातब्बरीच पणास लागते हे खरे; पण त्याहीखेरीज निवडणूक रिंगणातील काही घटक अगर तत्कालीन ‘फॅक्टर्स’ असे काही उभरून येतात की, त्यांना दुर्लक्षून कसलेही अंदाज अगर भाकीत वर्तविता येऊ नये. जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी या दोन्ही पूर्ण मतदारसंघासह धुळ्याचा समावेश असलेल्या अर्ध्या परिसरात प्रमुख उमेदवारांशिवाय इतरांची उमेदवारी व रिंगणात न उतरताही काहींची टिकून राहू शकणारी नाराजी म्हणूनच संबंधितांसाठी काळजीचा विषय ठरून जाणे स्वाभाविक ठरली आहे.नाशिक व दिंडोरी मतदारसंघांतील आघाडी व युतीचे उमेदवार घोषित झाल्याने लढतीचे चित्र स्पष्ट झालेले असले तरी या दोन्ही ठिकाणचे अन्य फॅक्टर्स लक्षात घेतल्याखेरीज पुढे जाता येण्यासारखी स्थिती नाही. नाशकात विद्यमान खासदार हेमंत गोडसे व माजी खासदार समीर भुजबळ या दोघांत अ‍ॅड. माणिकराव कोकाटे हे अपक्ष म्हणून अहमहमिकेने रिंगणात उतरण्यावर कायम आहेत. सिन्नरमधील मतांवर त्यांची विशेष भिस्त आहेच; पण प्रमुख दोघांना पर्याय म्हणून ‘आता बास’ म्हणत ते तोरण बांधण्यास निघाले आहेत. वंचित बहुजन आघाडीसह अन्यही काही रिंगणात असतील, या सा-या घटकांमुळे नाही म्हटले तरी, विशेष वर्गसमूहाच्या एकगठ्ठा मतांचे ध्रुवीकरण होण्याचे प्राथमिक अंदाज बांधता यावेत. या निवडणुकीत दिल्ली डोळ्यासमोर ठेवून मतदान होईल, त्यामुळे प्रमुख स्पर्धकांशिवाय इतर कोणी फारसे दखलपात्र ठरणार नाही, असे लाख म्हटले जात असले तरी या इतरांमधील, कोकाटे यांच्यासारख्यांची वैयक्तिक क्षमता मातब्बरांच्या गणिताचे कोडे जटिल करण्याइतपत नक्कीच असल्याने त्यांच्याकडे सहज म्हणून बघता येऊ नये.दिंडोरीत राष्ट्रवादीचे धनराज महाले व भाजपाच्या डॉ. भारती पवार यांच्यात माकपाचे जे.पी. गावित ‘तिसरे’ उमेदवार आहेतच; पण तिकीट कापल्याने नाराजी उघडपणे जाहीर केलेले विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची भूमिकाही उपद्रवकारी ठरू शकणारी आहे. तब्बल तीनवेळा खासदारकी भूषविलेली असल्याने ते थेट बंडखोरी करून रिंगणात उतरणारही नाहीत कदाचित, त्यासाठी पक्ष त्यांना अन्य संधीचे चॉकलेट्स देऊन थांबवेलही; पण म्हणून ते मन:पूर्वक पक्षकार्य करतील याची खात्री बाळगता येऊ नये. बरे, ते थांबतीलही; पण देवळा व चांदवडमधील ज्या स्थानिक राजकारणातून; म्हणजे तेथील पक्षाचे आमदार राहुल अहेर यांचा भविष्यकालीन मार्ग निष्कंटक करण्यासाठी चव्हाणांना ‘चेकमेट’ देऊन त्यांच्या समर्थकांना गारद करण्याची भूमिका घेतली गेली ते पाहता संबंधित चव्हाण समर्थक हे ‘आयात’ भारती पवार यांचा झेंडा इमाने-इतबारे उचलून आपल्या पुढील आशांवर स्वत:च्याच हाताने पाणी फेरून घेतील हे जरा अशक्य वाटते.तिकडे धुळ्यातही यापेक्षा वेगळी स्थिती दिसत नाही. भाजपाचे डॉ. सुभाष भामरे व काँग्रेसचे कुणाल पाटील यांच्यात अनिल गोटे उडी घेऊ पाहात आहेतच; पण त्याही व्यतिरिक्त काँग्रेसकडून तयारी केलेल्या व उमेदवारी कापली गेलेल्या मालेगावच्या अ‍ॅड. तुषार शेवाळे यांचा भ्रमनिरासही परिणामकारी ठरू शकणारा आहे. शेवाळे तसे काँग्रेसचे निष्ठावंत आहेत, पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे, त्यामुळे ते पक्षाला अडचणीत आणणारे पाऊल उचलणार नाहीतही; परंतु अगोदरपासूनच केलेली तयारी ऐनवेळी गुंडाळून ठेवावी लागल्याचे शल्य मनात घेऊन ते कुणाल पाटील यांचा प्रचार प्रामाणिकपणे करतील का, हा खुद्द काँग्रेस कार्यकर्त्यांनाच पडलेला प्रश्न आहे. शिवाय, भाजपा उमेदवार डॉ. भामरे यांनी गेल्यावेळी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून कमळ हाती धरलेले असल्याने मालेगावमधील शिवसैनिकही त्यांच्यासाठी फारसे अनुकूल नाहीत. ‘युती’त बिनसलेपण होते, तोपर्यंत राज्यमंत्री दादा भुसे व डॉ. भामरे यांच्यात झालेली खडाखडी अनेकांच्या विस्मृतीत गेलेली नाही. त्यामुळे एकूणच नाशिक व दिंडोरीसह धुळ्यातील मुख्य उमेदवारांखेरीजचे ‘फॅक्टर्स’ महत्त्वाचे ठरण्याची चिन्हे नाकारता येऊ नये.

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसHemant Godseहेमंत गोडसे