शेतकऱ्यांसाठी खरीपपूर्व प्रशिक्षण
By Admin | Updated: June 30, 2014 00:27 IST2014-06-28T22:26:04+5:302014-06-30T00:27:34+5:30
शेतकऱ्यांसाठी खरीपपूर्व प्रशिक्षण

शेतकऱ्यांसाठी खरीपपूर्व प्रशिक्षण
वाजगाव, देवळ्यात कृषी विभागाचा उपक्रमदेवळा : तालुका कृषी विभागातर्फे वाजगाव येथे शेतकऱ्यांसाठी खरीपपूर्व प्रशिक्षण घेण्यात आले. कृषी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
येथील मारुती मंदिरात यानिमित्ताने बैठक घेण्यात आली. कृषी पर्यवेक्षक एन. एन. जाधव यावेळी उपस्थित होते. कृषी सहाय्यक सुवर्णा पवार यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कृषी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या शेततळे डाळींब लागवड शेतीउपयोगी अवजारे, पॅकिंग हाउस आदि योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. वाजगाव येथे गारपिटीमुळे पीक उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले. याविषयी शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. यासाठी सर्व अनुदानपात्र शेतकऱ्यांच्या यादीचे वाचन करण्यात येऊन उपस्थितांचे शंका समाधान करण्यात आले. गावात कृषी विभागाची शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी इमारत आहे. परंतु गेल्या १५ वर्षांपासून या जागेवर वाजगाव वि.का. सोसायटीचे कार्यालय असल्याने ही जागा कृषी विभागाला वापरता येत नाही. यामुळे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होते. कृषी विभागातर्फे बियाणे, खते आदिंचे वाटप करण्यात येते. परंतु वाजगाव येथे साहित्य ठेवण्यासाठी जागा नसल्याने ते सर्व एखाद्या शेतकऱ्याच्या शेतावर उतरविले जाते. यामुळे त्याला सुरक्षितता लाभत नाही व अनेक शेतकरी खते, बियाणे आदिंच्या लाभापासून वंचित राहतात. त्यासाठी कृषी विभागाचे कार्यालय असणे गरजेचे आहे. सोसायटीकडे ग्रामस्थांनी यापूर्वी अनेकवेळा कृषी विभागाची जागा खाली करून देण्याबाबत मागणी केली आहे. (वार्ताहर)
परंतु वाजगाव सोसायटी ती जागा सोडण्यास तयार नाही. कृषी विभागाने ही जागा सोसायटीकडून ताब्यात घेऊन तेथे कृषी विभागाचे कार्यालय व गुदाम सुरूकरावे म्हणजे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होईल, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बैठकीस ग्रामपंचायत सदस्य विनोद देवरे, सुनील देवरे, विष्णू देवरे, अशोक गोराणे, वैजीनाथ देवरे, भाऊसाहेब देवरे, बापू वन्से, सोसायटीचे संचालक संजय गायकवाड, अशोक देवरे, अरुण महाले, बापू देवरे, बाळासाहेब खैरनार, सीताराम देवरे आदिंसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)