शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मालेगावी घरातच नमाज पठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 1:40 PM

मालेगाव : शहर व परिसरात शुक्रवारी कोरोनाच्या सावटाखाली रमजान ईद साजरी करण्यात आली.

ईदगाह मैदानावर शुकशुकाट : कडेकोट पोलीस बंदोबस्त, कोरोनाच्या सावटाखाली रमजान ईद साजरीमालेगाव : शहर व परिसरात शुक्रवारी कोरोनाच्या सावटाखाली रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लीम बांधवांनी घरातच नमाज व दुआ पठण करून, जगावर आलेले कोरोना महामारीचे संकट दूर होऊ दे, अशी प्रार्थना करीत रमजान ईद साजरी केली. राज्य शासनाने सामूहिक नमाज पठणाला बंदी घातली होती. स्थानिक प्रशासनाने ही मुस्लीम बांधवांनी घरातच नमाज अदा करावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला सलग दुसऱ्या वर्षी मालेगावकरांनी प्रतिसाद देत, मुस्लीम बांधवांनी संयम दाखवत, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही घरातच नमाज अदा केली. शहरात चंद्रदर्शन झाल्यानंतर चैतन्याचे उत्साहाचे वातावरण दिसून आले. मुस्लीम बांधवानी एकमेकांना अलिंगन देत, चांद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी सकाळी काही मुस्लीम बांधवांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रार्थनास्थळामध्ये नमाज पठण केले जगावर आलेले कोरोना महामारीचे संकट दूर व्हावे, देशात शांतता नांदावी, कोरोना महामारीतून मुक्तता मिळावी, बाधित रुग्णांची प्रकृती चांगली व्हावी, अशी प्रार्थना विविध प्रार्थनास्थळांमधून करण्यात आली. येथील पोलीस कवायत मैदानावरील ईदगाहकडे जाणारे रस्ते बॅरिकॅटिंग लावून रस्ते अडविण्यात आले होते. ईदगाह मैदानाकडे जाणाऱ्या कॅम्प रोड, मोसम पूल, सटाणा नाका, एकात्मता चौक, कॉलेज रोड परिसरात लोखंडी जाळ्या लावून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. परिणामी, मैदानावर शुकशुकाट दिसून आला, तर महापालिकेने शहरात स्वच्छता व पाणीपुरवठा सुरळीत होईल, यासाठी विशेष काळजी घेतली होती. गेल्या महिनाभरापासून नियमित नमाज, रोजे, नमाज पठण, विशेष तरावीहचे नमाज पठण अशा दिनचर्यामुळे पूर्वभागात उत्साहाचे वातावरण होते. रमजान ईद सर्वात मोठा सण आहे. ईदच्या नमाजानंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांना अलिंगन ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील पूर्व भागात दिवसभर उत्साहाचे नवचैतन्याचे वातावरण दिसून आले. पोलिसांनीही चौकाचौकात कडक बंदोबस्त ठेवला होता. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलीस उपाधीक्षक लता दोंदे यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले होते.-----------------------अक्षय तृतीयेचा सण पारंपरिक पद्धतीने साजरीसाडेतीन मुहूर्तांपैकी एक असा अक्षय तृतीया सण मालेगाव शहर व परिसरात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या संकटामुळे अक्षय तृतीया सणावर विरजन आले असले, तरी नागरिकांनी घरात घागर पूजन व इतर पूजाविधी करून घेतला. कोरोनामुळे पाहुण्यांची गर्दी दिसले नाही, तरी घरातल्या घरात नागरिकांनी अक्षय तृतीयेचा सण साजरा करून कोरोनाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना देवाकडे केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक