तरुणसागरजी यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 01:16 IST2018-08-27T01:15:21+5:302018-08-27T01:16:16+5:30

जैन मुनीश्री आचार्य तरुणसागरजी यांना गंभीर आजाराने ग्रासले असून, त्यांच्यावर गाझियाबाद येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 Prayer for the health of youngsagarji | तरुणसागरजी यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना

तरुणसागरजी यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना

नाशिक : जैन मुनीश्री आचार्य तरुणसागरजी यांना गंभीर आजाराने ग्रासले असून, त्यांच्यावर गाझियाबाद येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी रक्षाबंधनाच्या (राखी पौर्णिमा) निमित्त देशभरात एक करोड नवकार महामंत्राचा जप करण्यात आला. नाशिक शहरात तीन ठिकाणी दिवसभरात सुमारे ८० हजारपेक्षा अधिकवेळा नवकार महामंत्र जप करण्यात आला.  जैन धर्मियांमध्ये नवकार महामंत्र जपाचे अत्यंत मोलाचे स्थान आहे. हा मंत्र सगळ्यात मोठा मंत्र मानला जातो. जैन धर्मातील प्रत्येकजण या मंत्राचा जप करतात. त्यामुळे रक्षाबंधन सणाला देशभरात सुमारे एक करोड नवकार महामंत्र जप करण्यात येत आहे. यात सोलापूर, मालेगाव, मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी शहरांचा समावेश आहे.
नाशिक येथे गजपंथ येथे सकाळी नवकार महामंत्र जप करण्यात आला. तसेच दुपारी नाशिकरोड आणि सायंकाळी म्हसरूळ, गजपंथ सोसायटीत हर्षवर्धन गांधी यांच्या निवासस्थानी नवकार महामंत्र जप करण्यात आला. शहरात दिवसभरात सुमारे ८० हजारपेक्षा अधिकवेळा नवकार महामंत्र जप करण्यात आला.

Web Title:  Prayer for the health of youngsagarji