‘भारत श्री’ प्रशांत साळुंखे यांची प्रात्यक्षिके

By Admin | Updated: May 13, 2015 01:06 IST2015-05-13T01:06:25+5:302015-05-13T01:06:50+5:30

‘भारत श्री’ प्रशांत साळुंखे यांची प्रात्यक्षिके

Prashant Salunkhe's 'India Shree' demonstration | ‘भारत श्री’ प्रशांत साळुंखे यांची प्रात्यक्षिके

‘भारत श्री’ प्रशांत साळुंखे यांची प्रात्यक्षिके

नाशिक : नाशिक बॉडीबिल्डिंग अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन व सर्वप्रथम डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘नाशिक श्री’ शरीरसाौष्ठव स्पर्धेच्या निमित्ताने नाशिककरांना ‘भारत श्री’ साळुंखे आणि मिस इंडिया करुणा यांच्या शरीरसौष्ठवाची प्रात्यक्षिके बघण्याची संधी मिळणार आहे. मुंबई महामार्गावरील गोंदे दुमाला परिसरातील आनंदवन टाऊनशिप येथे या स्पर्धेचे दि. १५ रोजी आयोजन करण्यात आले आहे. सदरची स्पर्धा ५५ ते ७५ किलो वजनी गटात होणार आहे. नाशिक श्री किताब पटकावणाऱ्यास २१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच उत्कृष्ट पोझर, मोस्ट इंप्रुव्हमेंट बॉडीबिल्डर तसेच फिजिकल चॅलेंज विजेत्यास रोख स्वरूपातील बक्षिसे दिली जाणार आहेत. त्याचप्रमाणे सातही गटांतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यास सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक व प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या स्पर्धेसाठी केंद्रीय समाजकल्याणमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री सुदर्शन भगत, आशिया व भारतीय शरीरसौष्ठव महसंघाचे सरचिटणीस संजय मोरे, नाशिक संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र वावरे, उपाध्यक्ष अजय बोरस्ते, अजिंक्य वाघ, अनिरुद्ध धर्माधिकारी, विशाल वावरे, किशोर सेठ उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेस संचालक आनंद खट्टर, विकास गुप्ता, बी. एस. लोहिया, राजेंद्र सातपूरकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Prashant Salunkhe's 'India Shree' demonstration