‘फोटो हंटर्स’ स्पर्धेत प्रशांत खरोटे यांना सुवर्णआंतरराष्टÑीय पुरस्कार : ‘पत्रकारिता’ गटात सुयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:09 IST2017-09-10T01:09:18+5:302017-09-10T01:09:32+5:30

फोटो हंटर्स असो-सिएशनकडून भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ‘फोटो हंटर्स फोटो कॉन्टेस्ट’मधील पत्रकारिता गटात ‘लोकमत’ नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी एक सुवर्ण व रजतपदक प्राप्त केले.

Prashant kharte has won Gold International Award for 'Photo Hunters': Suhash in 'Journalism' group | ‘फोटो हंटर्स’ स्पर्धेत प्रशांत खरोटे यांना सुवर्णआंतरराष्टÑीय पुरस्कार : ‘पत्रकारिता’ गटात सुयश

‘फोटो हंटर्स’ स्पर्धेत प्रशांत खरोटे यांना सुवर्णआंतरराष्टÑीय पुरस्कार : ‘पत्रकारिता’ गटात सुयश

नाशिक : फोटो हंटर्स असो-सिएशनकडून भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ‘फोटो हंटर्स फोटो कॉन्टेस्ट’मधील पत्रकारिता गटात ‘लोकमत’ नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी एक सुवर्ण व रजतपदक प्राप्त केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील फोटोग्राफिक सोसायटी आॅफ अमेरिका (पीएसए) आणि इंटरनॅशनल युनियन आॅफ फोटोग्राफर्स, चीन (आययूपी)च्या संयुक्त विद्यमाने कोलकाता येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फोटो हंटर्स स्पर्धेत एकूण २२ देशांमधील २०० छायाचित्रकारांनी विविध गटांमध्ये सहभाग घेतला होता. त्यापैकी भारतातून एकूण १०५ स्पर्धक होते, तर पत्रकारिता गटात एकूण ५८ स्पर्धकांचा सहभाग होता. त्यामध्ये २१ छायाचित्रे बक्षीसपात्र ठरली. या गटात पीएसएच्या प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदकाचे मानकरी भारतातून खरोटे हे एकमेव ठरले, अशी माहिती असोसिएशनचे स्पर्धेचे अध्यक्ष अभिजित बॅनर्जी यांनी दिली.

Web Title: Prashant kharte has won Gold International Award for 'Photo Hunters': Suhash in 'Journalism' group