चांदवडला हनुमान मंदिरात १११ किलो लाडूंचा प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:11 IST2018-04-02T00:11:04+5:302018-04-02T00:11:04+5:30
चांदवड : येथील आठवडे बाजारातील हेमाडपंती श्रीरामभक्त हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

चांदवडला हनुमान मंदिरात १११ किलो लाडूंचा प्रसाद
चांदवड : येथील आठवडे बाजारातील हेमाडपंती श्रीरामभक्त हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. भाविक-भक्तांना १११ किलोचा लाडंूचा प्रसाद वाटण्यात आला. यावेळी मोठा भक्तगण समुदाय उपस्थित होता. या कार्यक्रमप्रसंगी भूषण कासलीवाल, नगरसेवक अॅड. नवनाथ अहेर, सुनील डुंगरवाल, राजकुमार संकलेचा, पोपटराव चौधरी, विशाल ललवाणी, अनिल कोतवाल, नीलेश गुजराथी, विप्लेश कासलीवाल, आदित्य फलके, देवा पाटील, सर्व ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते. येथील इंद्रायणी कॉलनी येथील स्वामी जयदेवपुरी महाराज यांच्या प्रेरणेने साकार झालेल्या दक्षिणमुखी संकटमोचन वज्र हनुमान मंदिराच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (दि. ३) रात्री ८ ते १० या वेळेत भजन, अभंग, गवळणी, भक्तिगीते, भारुड व गीतांचा बहारदार कार्यक्रम सादरकर्ते राधेश्याम चव्हाण व त्यांचा चमू सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इंद्रायणी कॉलनी येथील नागरिकांनी केले आहे. इंद्रायणी कॉलनीतील दक्षिणमुखी संकटमोचन वज्र हनुमान मंदिरात जयंतीनिमित्त भाविकांनी प्रसादाचे आयोजन केले होते. तर हनुमान व्यायामशाळा येथे हनुमान जन्मोत्सव झाला. पौरोेहित्य अरुण दीक्षित यांनी केले.