महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश शेवाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST2021-07-19T04:10:48+5:302021-07-19T04:10:48+5:30

सातपूर येथील मसालाज वन येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याचे कार्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा घेण्यात ...

Prakash Shewale as the President of Maharashtra State Primary Teachers Association | महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश शेवाळे

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश शेवाळे

सातपूर येथील मसालाज वन येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याचे कार्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून संघाचे मावळते अध्यक्ष सुनील खेलुकर उपस्थित होते. यावेळी खेलुकर यांनी त्यांच्या कार्यकाळातील आढावा सादर केला. तर कार्याध्यक्ष वाजे यांनी मार्गदर्शन करून नवीन कार्यकारिणी घोषित केली. त्यात शहरअध्यक्ष प्रकाश शेवाळे, उपाध्यक्ष बाळासाहेब आरोटे, सरचिटणीस ईश्वर चव्हाण, कार्याध्यक्ष विनायक मते, कोषाध्यक्ष राहुल देसले, महिला आघाडी प्रमुख सरला पाटील आदींसह ४१ शिक्षकांचा समावेश आहे. यावेळी सरला पाटील, गुलाम अन्सारी यांनी मनोगत व्यक्त केले. संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच त्यांच्यावर अन्याय होणार नाही याकडे लक्ष दिले जाईल व संघटनेची ध्येय धोरणे सर्व सभासदांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश शेवाळे यांनी दिली. यावेळी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन भास्कर राठोड यांनी केले. ईश्वर चव्हाण यांनी आभार मानले.

फोटो :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नूतन शहर अध्यक्ष प्रकाश शेवाळे, सरचिटणीस ईश्वर चव्हाण यांच्यासह अंबादास वाजे, सुनील खेलुकर, बाळासाहेब आरोटे, विनायक मते, राहुल देसले, सरला पाटील, भास्कर राठोड आदींसह शिक्षक.

Web Title: Prakash Shewale as the President of Maharashtra State Primary Teachers Association