मराठी साहित्य महामंडळावर प्रकाश होळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 01:08 IST2022-03-26T01:08:08+5:302022-03-26T01:08:31+5:30
नामवंत कवी प्रकाश होळकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. होळकर यांच्या निवडीने नाशिक जिल्ह्याला प्रथमच हा बहुमान मिळाला आहे.

मराठी साहित्य महामंडळावर प्रकाश होळकर
लासलगाव : येथील नामवंत कवी प्रकाश होळकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. होळकर यांच्या निवडीने नाशिक जिल्ह्याला प्रथमच हा बहुमान मिळाला आहे.
फलटण, जि. सातारा येथे सत्ताविसावे विभागीय साहित्य संमेलन नुकतेच संपन्न झाले. या संमेलनास जोडूनच महाराष्ट्र साहित्य परिषद, पुण्याची बैठक कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला कार्यवाह प्रकाश पायगुडे , कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार व इतर वीस सदस्य उपस्थित होते. सुरुवातीला अटीतटीच्या वाटणाऱ्या बैठकीत कवी प्रकाश होळकर यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले व होळकर यांची महामंडळावर बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. साहित्य महामंडळाच्या इतिहासात प्रथमच नाशिक जिल्ह्याला सदस्यपद मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीच्या सदस्यपदी आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी अलीकडेच होळकर यांची नियुक्ती झालेली आहे.