सटाणा बाजार समितीच्या उपसभापतीपदी प्रकाश देवरे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 14:32 IST2020-07-05T14:31:54+5:302020-07-05T14:32:56+5:30
सटाणा : येथील बाजार समितिीच्या उपसभापतिपदी अजमिर सौंदाणे गणाचे संचालक प्रकाश चिंतामण देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सटाणा बाजार समितीच्या उपसभापतीपदी प्रकाश देवरे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करतांना प्रशांत बच्छाव समवेत सुनिता देवरे, प्रभाकर रौंदळ, संजय सोनवणे, संजय देवरे, नरेंद्र अहिरे, पंकज ठाकरे, श्रीधर कोठावदे, जयप्रकाश सोनवणे, सरदारसिंग जाधव, संदिप साळे, मधुकर देवरे, संचालिका रत्नमाला सुर्यवंशी, वेणबाई माळी, सचिव भास्कर तांबे आदी.
सटाणा : येथील बाजार समितिीच्या उपसभापतिपदी अजमिर सौंदाणे गणाचे संचालक प्रकाश चिंतामण देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
प्रभाकर रौंदळ यांनी उपसभापतीपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या रिक्त पदाच्या निवडीसाठी शनिवारी (दि.४) सकाळी ११ वाजता सभापती सुनिता देवरे यांनी बोलविलेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत या रिक्त पदाबाबत चर्चा होऊन या पदासाठी अजमिर सौंदाणे गणाचे संचालक प्रकाश चिंतामण देवरे यांच्या नावावर एकमत होऊन अर्ज भरण्यात आला. निर्धारित वेळेत अर्ज दाखल झाल्याने सभापती देवरे यांनी उपसभापतिपदी प्रकाश देवरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. देवरे यांना श्रीधर कोठावदे, संजय बिरारी हे सूचक व अनुमोदक होते. निवडीनंतर मावळते उपसभापती रौंदळ यांच्या हस्ते देवरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ संचालक श्रीधर कोठावदे, सरदारसिंग जाधव, संजय सोनवणे, नरेंद्र अहिरे, संजय देवरे, पंकज ठाकरे, मधुकर देवरे, तुकाराम देशमुख, जयप्रकाश सोनवणे, संदीप साळे, केशव मांडवडे, रत्नमाला सूर्यवंशी, मंगल सोनवणे, वेणूबाई माळी, किरण अहिरे, विनोद अहिरे, बिंदू शर्मा, प्रसाद पवार आदी उपस्थित होते.