The practice of Republic Day exercises | प्रजासत्ताक दिनाच्या कवायतींचा सराव

प्रजासत्ताक दिनाच्या कवायतींचा सराव

पिंपळगाव बसवंत : प्रजासत्ताक दिनानिमित्त सादर करण्यात येणाऱ्या विविध कवायतींचा सराव पिंपळगाव हायस्कूल येथे जोमात सुरू आहे. तालुक्यातून देशप्रेमी २६ जानेवारीला हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी करत असतात. त्यामुळे प्रजासत्ताक दिन व परेडची कसरत यासह विविध प्रात्यक्षिकांचा सराव विद्यार्थी करत आहेत. यावर्षी घोड्यावर व बुलेटवरील कसरतींचे विशेष आकर्षण ठरणार आहे. कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींतर्फे लेजीम व योगा यासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती एनसीसी अधिकारी नितीन डोखळे, मुख्याध्यापक ए. जे. मोरे यांनी दिली.

Web Title: The practice of Republic Day exercises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.