महात्मा गांधी पुतळ्यापासून प्रभातफेरीला सुरूवात झाली. फेरीमध्ये दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येचा अद्याप तपास न लागल्याच्या निषेधार्थ ‘जबाब दो’, ‘संविधान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. फेरी बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात नेण्यात आली. तेथे अंनिस मालेगाव शाखेचे कार्याध्यक्ष डॉ. संदीप खैरनार यांनी मार्गदर्शन केले. दाभोलकर यांची हत्या जरी झाली असली तरी त्यांचे विचार कोणी संपवू शकत नाही. हत्येस पाच वर्ष झाली असून अजुन किती वाट पहावी लागेल याची शाश्वती नाही. त्यामुळे या शासनाचा निषेध करतो असे त्यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र भोसले यांचेही भाषण झाले. दाभोलकर यांच्यासह इतर व्यक्तींच्या विचारसरणी कायम जिवंत राहणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमात राष्टÑ सेवादल राज्य सचिव नचिकेत कोळपकर, उपक्रम प्रमुख नम्रता जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे प्रभात फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 21:59 IST