टाळेबंदी हटूनही ‘पॉवरडील’ बंदच
By Admin | Updated: August 23, 2015 22:59 IST2015-08-23T22:58:27+5:302015-08-23T22:59:01+5:30
कामगार हवालदिल : क्रॉम्प्टन पॅटर्न वापरण्याची मागणी

टाळेबंदी हटूनही ‘पॉवरडील’ बंदच
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीत क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीचा संप अखेर मिटला असून, या कारखान्यात उत्पादन सुरळीत सुरू झाले आहे. पॉवरडीलमध्ये टाळेबंदी हटवूनही अद्यापही व्यवस्थापनाने हा कारखाना सुरू केलेला नाही. त्यामुळे क्रॉम्प्टन पाठोपाठ हा कारखानाही त्वरित सुरू करावा, या अपेक्षेवर कामगार आहेत.
क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीत गेल्या १०३ दिवसांपासून सुरू असलेला संप अखेरीस निमा-आयमा या संस्था तसेच कामगार संघटनेच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे कामगार उपआयुक्तांच्या बैठकीत मिटला. दरम्यान, कामगार उपआयुक्तांकडे यासंदर्भात वाद प्रविष्ट असतानाच व्यवस्थापनाने १२ जूनपासून टाळेबंदी जाहीर केली असून, त्यामुळे कामगार रस्त्यावर आले आहेत. मध्यंतरी म्हणजेच १३ जुलै रोजी कामगार उपआयुक्तांनी ही टाळेबंदी बेकायदा ठरविली; परंतु त्यानंतरही व्यवस्थापनाने अद्याप कारखाना सुरू केलेला नाही. गेल्या १७ तारखेला कामगार उपआयुक्तांनी कंपनी व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे; परंतु व्यवस्थापनाने अद्याप त्याला प्रतिसाद दिला नसल्याचे कामगार संघटनेचे म्हणणे आहे. कंपनीने आर्थिक तोट्याचे कारण दाखविल्यानंतर कामगार संघटनेने सबुरीची भूमिका घेत आहे, त्या स्थितीत आणि वेतनावर कामगार काम करण्यास तयार
आहे. (प्रतिनिधी)