देवळा तालुक्यात वीज कर्मचाऱ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 00:50 IST2021-03-16T22:37:54+5:302021-03-17T00:50:06+5:30

लोहोणेर : थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना मंगळवारी (दि.१६) दुपारी देवळा तालुक्यातील वासोळ येथे ...

Power workers beaten up in Deola taluka | देवळा तालुक्यात वीज कर्मचाऱ्यांना मारहाण

देवळा तालुक्यात वीज कर्मचाऱ्यांना मारहाण

ठळक मुद्देगु्न्हा दाखल : वासोळ येथील प्रकार

लोहोणेर : थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना मंगळवारी (दि.१६) दुपारी देवळा तालुक्यातील वासोळ येथे मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे थकीत वीज बिलांची वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, सहायक अभियंता दीपक गांगुर्डे यांनी देवळा पोलिसात नोंदविलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी दुपारी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी गोरख निकम व नितीन पवार हे तालुक्यातील वासोळ येथे रामदास सखाराम गवळी यांच्याकडे थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी गेले होते. यावेळी वीजग्राहक गवळी यांनी वीज बिल भरण्यास नकार देऊन दोघा कर्मचाऱ्यांना त्यांनी शिवीगाळ केली. निकम यांनी शिवीगाळ करू नको असे सांगितले असता रामदास गवळी, अनिल गवळी, गोरख गवळी, घरातील इतर महिला व पुरुषांनी निकम यांच्यासह पवार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी वेळीच मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Power workers beaten up in Deola taluka