सत्ता, संपत्ती, सौंदर्य हे जीवनाचे वैभव नाही : आचार्य रत्नसुंदर सुरीश्वरजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:31 IST2020-01-15T23:21:46+5:302020-01-16T00:31:11+5:30
आपल्या संघर्षमय जीवनात सत्ता, संपत्ती, स्वास्थ्य, सौंदर्य हे जीवनाचे वैभव नसून आपले निर्मळ जीवन संपवण्याचे साधन आहे. त्यांच्या आहारी जाऊ नका, आपण जो व्यवसाय करतात, त्यात तरी आपणास शांती मिळते काय? असा परखड सवाल जैनाचार्य व रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज यांनी केले.

सत्ता, संपत्ती, सौंदर्य हे जीवनाचे वैभव नाही : आचार्य रत्नसुंदर सुरीश्वरजी
नाशिक : आपल्या संघर्षमय जीवनात सत्ता, संपत्ती, स्वास्थ्य, सौंदर्य हे जीवनाचे वैभव नसून आपले निर्मळ जीवन संपवण्याचे साधन आहे. त्यांच्या आहारी जाऊ नका, आपण जो व्यवसाय करतात, त्यात तरी आपणास शांती मिळते काय? असा परखड सवाल जैनाचार्य व रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज यांनी केले.
सिडको येथे अश्विननगरात ‘जीवन जीने की जडीबुटी’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत महाराज बोलत होते. यावेळी पुढे बोलताना महाराज म्हणाले की, जीवनामध्ये चार प्रमुख मूल्य आहेत. विचार, विवेक, वात्सल्य, पराक्रम ही मूलतत्त्वे आहेत. या मूल्यांवर विचार केला
तर आपले जीवन पवित्र होण्यास मदत होईल. पूर्वीच्या जमान्यात पैसे कमी मिळत होते, पण प्रसन्नता खूप होती. यावेळी स्वागत प्रवीण जैन, प्रीती जैन यांनी केले. कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, महेश हिरे, नगरसेवक गोविंद घुगे, नगरसेवक किरण गामणे, विकास शहा, राजेंद्र शहा, गौतम सुराणा, अनिल नहार, महेश शहा, शेखर सराफ, राजन पारीख आदींसह भाविक उपस्थित होते. आज व्यवसाय कितीही होवो, आपणास समाधान मिळत नाही. गुटखा, पान-मसाला, सिगारेटमुळे मजा वाटत असेल, परिणाम मात्र कॅन्सर आहे. याचा कधी विचार केला काय? आपण संसारात आहात, पण सुख, चैनीच्या वस्तू जीवन बरबाद करून टाकतात. आपली जीवनशैली बदलवायची असेल तर प्रथम आपण बदलले पाहिजे, मग दुसऱ्याचा विचार करा, असे आवाहन आचार्यांनी केले.