भरपावसात सुरू केला धामणगावचा वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:19 IST2021-08-20T04:19:20+5:302021-08-20T04:19:20+5:30
येवला : तालुक्यातील धामणगाव येथे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणचे कर्मचारी सचिन गवळी यांनी भरपावसातही कर्तव्य बजावून सुरू केल्याने ग्रामस्थांनी ...

भरपावसात सुरू केला धामणगावचा वीजपुरवठा
येवला : तालुक्यातील धामणगाव येथे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणचे कर्मचारी सचिन गवळी यांनी भरपावसातही कर्तव्य बजावून सुरू केल्याने ग्रामस्थांनी त्याचे आभार मानत कौतुक केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून धामणगाव येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. खंडित वीजपुरवठ्याने वाड्या-वस्तीवरील लोक त्रस्त झाले होते. महावितरणच्या रहाडी फिडर येथे दोष आढळून आला. या वेळी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी सचिन गवळी यांनी भरपावसात तो दोष काढून वीजपुरवठा सुरळीत केला.
गवळी यांची सकाळपासून लाईट सुरू करण्यासाठीची सुरू असलेली धडपड पाहून ग्रामस्थांनी कौतुक व समाधान व्यक्त केले. त्यांना स्थानिक ग्रामस्थ संतोष थोरात, सुनील फाळके, प्रवीण बोढरे, राहुल जाधव आदींनी सहकार्य केले. (१९ येवला ४)
190821\19nsk_46_19082021_13.jpg
भरपावसात तो दोष काढून वीज पुरवठा सुरळीत केला.