गुणवंत पिढी समाजाचे बलस्थान

By Admin | Updated: August 23, 2015 23:17 IST2015-08-23T23:11:29+5:302015-08-23T23:17:52+5:30

विजय बिरारी : विठ्ठल मंदिर ट्रस्टतर्फे गुणगौर

The power of quality generation community | गुणवंत पिढी समाजाचे बलस्थान

गुणवंत पिढी समाजाचे बलस्थान

वनाशिक : कुटुंब शिकले, तर समाज मोठा होत असतो. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील गुणवंत पिढी ही समाजाचे बलस्थान असून, अशा गुणीजनांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे अध्यक्ष विजय बिरारी यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलताना केले.
कापड बाजारातील शिंपी समाजाच्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर ट्रस्टच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विजय बिरारी होते. यावेळी बिरारी यांनी समाजाच्या संघटनावर भर देत समाजाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. समस्त शिंपी समाजाचे प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर यांनीही समाज संघटित करण्यासाठी विविध उपक्रमांची माहिती देत यापुढे एकत्रितरीत्या संत नामदेव महाराजांची जयंती साजरी करण्याचा संकल्प सोडला. समाजातील ८ ते १० वीच्या विद्यार्थ्यांची ब्रेन मॅपिंग चाचणी विनामूल्य घेण्यात येणार असल्याचेही नेवासकर यांनी जाहीर केले. समाजाचे उपाध्यक्ष रवींद्र बागुल यांनीही मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पहिली ते पदव्युत्तर शिक्षणात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जेईई अ‍ॅडव्हॉन्स परीक्षेत धवल कामगिरी करणाऱ्या निखिल गवादे यासही गौरविण्यात आले. सिडकोतील अंध व्यावसायिक प्रशांत सोनवणे यांना सिडकोतील समाजाने व्यवसायासाठी टपरी उपलब्ध करून दिल्यानंतर ट्रस्टनेही त्यांना एक हजार रुपयांची मदत जाहीर केली. सूत्रसंचालन हेमंत सोनवणी व सुनील बाबूराव जगताप यांनी केले.
व्यासपीठावर नारायण जगताप, अमर सोनवणे, ट्रस्टचे अध्यक्ष संदीप खैरनार, नाशिकरोडचे अध्यक्ष संजय खैरनार, हितवर्धक मंडळाचे सचिन बोरसे, सुनील काशीनाथ जगताप, किशोर जगताप, नंदलाल जगताप, राजेश जगताप, धारणकर, श्रीनिवास निकुंभ, शोभा बोरसे, पल्लवी कापडणे, सुनंदा बाविस्कर आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: The power of quality generation community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.