वणीत विजपुरवठा खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 00:48 IST2020-09-10T22:19:57+5:302020-09-11T00:48:42+5:30
वणी : गुरु वारी (दि.१०) दुपारच्या सुमारास विद्युत पुरवठा अचानक खंडीत झाला. दुरु स्तीचे काम सुरु होते. मात्र त्याला बराच कालावधक्ष लागला. दुपारी साडेतीन सुमारास विद्युत पुरवठा खंडीत झाला.

वणीत विजपुरवठा खंडीत
वणी : गुरु वारी (दि.१०) दुपारच्या सुमारास विद्युत पुरवठा अचानक खंडीत झाला. दुरु स्तीचे काम सुरु होते. मात्र त्याला बराच कालावधक्ष लागला. दुपारी साडेतीन सुमारास विद्युत पुरवठा खंडीत झाला. याबाबत विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठअभियंता मुळकर यांच्याशी संपर्क साधला असता दिंडोरी येथील १३३ केव्ही विद्युत केन्द्रातुन वणी शहराचा विजपुरवठा तांत्रिक बिघाडामुळे खंडीत झाल्याची माहीती देण्यात आली. अर्धा- एक तासाने विजपुरवठा पुर्ववत होईल अशी शक्यता सांगण्यातआली. मात्र रात्री उशिरापर्यंत विजपुरवठा पुर्ववत झाला नाही. कादवा म्हाळुंगी परिसरात वाघदेव फाट्यालगत वीज पडल्याने विद्युत वाहीनी क्षतीग्रस्त झाल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाल्याची माहीती देण्यात आली. दरम्यान सुरगाणा येथे विजपुरवठा करणाऱ्या तांत्रिक उपकरणातुन रात्री साडेनऊच्या सुमारास वणी शहरासाठी विजपुरवठा सुरु करण्यात आल्याची माहीती विज वितरण कंपनीकडून देण्यातआली.