शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मनपात सत्तांतराच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:57 IST

विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी आणि कॉँग्रेसने चांगली मजल मारल्यानंतर आता स्थानिक स्वराज संस्थांवरदेखील लक्ष केंद्रित केले जाण्याचे संकेत छगन भुजबळ यांनी दिले आहेत. शिवसेनेलादेखील सत्ता हवीच असल्याने आता पुढील महिन्यात होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत सत्तांतराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी आणि कॉँग्रेसने चांगली मजल मारल्यानंतर आता स्थानिक स्वराज संस्थांवरदेखील लक्ष केंद्रित केले जाण्याचे संकेत छगन भुजबळ यांनी दिले आहेत. शिवसेनेलादेखील सत्ता हवीच असल्याने आता पुढील महिन्यात होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत सत्तांतराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.अर्थातच त्यासाठी भाजपचे काही नगरसेवक फोडण्याचे महत्त्वाचे काम करण्याची तयारी सुरू असून, ते यशस्वी झाल्यास शिवसेना, मनसे, कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि अपक्ष अशी मोट बदलून महापौरपद मिळवण्याची तयारी सुरू झाल्याचे वृत्त आहे. महापौरपदाची निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या आधी म्हणजेच सप्टेंबर महिन्यात होणार होती.मात्र, महापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून, भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे तिकीट कापल्याने ते राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये दाखल झाले आणि पक्षानेदेखील त्यांना उमेदवारी दिली. त्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे सानप यांना भेटल्याने त्याचवेळी वेगळे समीकरण जुळवले जात असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यात आता राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची भर पडली आहे. आघाडीने चांगला कौल मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांवर लक्ष असल्याचे सांगितल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.सानप यांच्यावर मोठी जबाबदारीभाजपाचे शहराध्यक्ष असताना बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या होत्या आणि ६६ जागा मिळाल्या. सानप यांनी अनेक जणांना उमेदवारी दिली होती. काही नगरसेवक विधानसभा निवडणुकीत त्यांचा खुला प्रचार करीत होते तर काही जण छुपा प्रचार करीत होते यामुळे महापालिकेतील सत्तांतरासाठी त्यांच्यावर राष्टवादी कॉँग्रेस जबाबदारी देऊ शकते.पक्षांतराची अडचणमहापालिका अधिनियमात यापूर्वी पक्षातून फुटून वेगळा गट नोंदविण्याची तरतूद होती. पक्षातील एक तृतीयांश नगरसेवक फुटून वेगळा गट नोंदवू शकत होते. मात्र अनार्हता शीर्षाखालील कलम ४ मधील ही तरतूद २००६ मध्ये हटविण्यात आली असल्याने आता ब गट स्थापनेसारखे प्रकार करणे शक्य नाही. पक्षादेशाच्या विरोधात कृती केल्यास थेट अपात्र ठरविले जाईल. आता फोडाफोडीचे राजकारण कसे जमते ते बघणे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण