तळवाडे ग्रामपालिकेत परिवर्तनची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 17:50 IST2019-06-24T17:50:25+5:302019-06-24T17:50:39+5:30
चुरशीच्या लढती : सरपंचपदी नीता सांगळे विजयी

तळवाडे ग्रामपालिकेत परिवर्तनची सत्ता
सायखेडा : निफाड, सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील तळवाडे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची होऊन निवडणुकीत परिवर्तन पँनलच्या सर्वाधिक सहा जागा निवडून आल्या आहेत तर विरोधी पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. जनतेतून थेट सरपंच निवडीत नीता राजेश सांगळे या ४२६ मते मिळवून निवडून आल्या आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार लता राजेंद्र सांगळे आणि अनिता राजू सांगळे यांचा पराभव केला आहे.
दुष्काळ,पाणी आणि सरहद्दीवरील गाव यामुळे विकासाच्या दृष्टीने खूप दूर राहिलेल्या तळवाडे ग्रामपंचयातीची पंचवार्षिक निवडणूक झाली. प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवडणूक असल्याने निवडणुकीवर गावाचे लक्ष केंद्रित झाले होते. सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला हे आरक्षण निघाले होते. त्यासाठी चार उमेदवार रिंगणात होते तर परिवर्तन आणि बजरंग बली पॅनल हे दोन्ही पॅनल एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. चुरशीच्या निवडणुकीत विठ्ठल सांगळे (१८१), शारदा सांगळे (२३६),धर्मेंद्र गायकवाड (३१९) स्वाती सांगळे (३७५),अर्चना सांगळे (३४८), सचिन साळवे(१५५) आणि पूनम भापकर (१६०) हे उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी परिवर्तन पँनलचे नेते निसाकाचे माजी व्हाईस चेअरमन पंडित सांगळे, सदाशिव नाना सांगळे, परशराम भापकर , खंडेराव भापकर, जयराम सांगळे , शिवाजी बाबा गवते , शिवाजी सांगळे , राजेश सांगळे ,मोहन सांगळे,नितीन भापकर, संदिप सांगळे,भाऊलाल सांगळे आदी उपस्थित होते.