शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरे केंद्र जागेवर सोलर पॉवर प्लॅन्टची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:20 IST

औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पापर्यंत कोळसा पोहचविणे खर्चिक बाब असल्याने अशा प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करणे आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरत आहे. त्यामुळे असे प्रकल्प वाढविण्यापेक्षा आहे त्या स्थितीत ठेवून तेथील जागांवर सोलर पॉवर एनर्जी प्रकल्प उभारण्याची योजना असल्याने एकलहरे येथील जागेत सोलर पॉवर प्लॅन्ट उभारला जाऊ शकतो, असे संकेत राज्याच्या होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी दिले.

नाशिक : औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पापर्यंत कोळसा पोहचविणे खर्चिक बाब असल्याने अशा प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करणे आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरत आहे. त्यामुळे असे प्रकल्प वाढविण्यापेक्षा आहे त्या स्थितीत ठेवून तेथील जागांवर सोलर पॉवर एनर्जी प्रकल्प उभारण्याची योजना असल्याने एकलहरे येथील जागेत सोलर पॉवर प्लॅन्ट उभारला जाऊ शकतो, असे संकेत राज्याच्या होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी दिले. त्यामुळे एकलहरे औष्णिक केंद्राच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.आघाडी सरकारच्या काळात एकलहरे येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे विस्तारीकरण करण्याच्या हालचाली सुरू असतानाच सत्तांतरानंतर एकलहरे प्रकल्प थेट नागपूरला स्थलांतरित करण्याबाबतची चर्चा होऊ लागली. त्यामुळे येथील कामगार, पूरक व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी सदर प्रकल्प कामयस्वरूपी सुरू राहावा यासाठी कृती समितीच्या माध्यमातून लढा सुरू केला आहे. यापूर्वी पाच संचाच्या साह्याने सुमारे साडेनऊशे मेगावॉट वीज निर्मिती करणाऱ्या केंद्रातील संच टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले आहेत तर सध्या २१० मेगावॉटचे केवळ तीन संच कार्यान्वित आहेत.ग्रीन एनर्जी प्रस्तावित१२व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांमध्ये संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात पवन आणि सौरऊर्जा वीज निर्मिती प्रकल्पांची उभारणी प्रस्तावित आहे. यासाठी नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे नवीन प्रकल्पांच्या उभारणीसाठी ग्रीन एनर्जी कॉरिडॉर योजना राबविण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून एकलहरे येथील जागेची पडताळणी होऊन शकते. एकलहरे प्रकल्पाची सुमारे ६८५ हेक्टर इतकी जागा आहे तर यातील केवळ ३५ ते ४० टक्केच जागेचा वापर होत असून उर्वरित जागा पडून आहे.ज्या औष्णिक प्रकल्पांमधून कमी प्रमाणात वीज निर्मिती होत आहे तेथील उपलब्ध जागेचा वापर हा सोलर पॉवर प्लॅन्ट उभारण्यासाठी करण्याचा सरकारचा विचार आहे. एकलहरे येथील रोजगार कमी होऊ नये म्हणून या ठिकाणी सोलर प्लॅन्टचा पर्याय असल्याचे सुचक विधानही पाठक यांनी केले आहे. त्यामुळे औष्णिक केंद्र केव्हाही गुंडाळले जाऊ शकते, असाच अर्थ यातून काढला जात आहे.औष्णिक वीज निर्मिती करणे खर्चिक बाब असल्यामुळे या केंद्रातून कमी प्रमाणात वीज निर्मिती केली जात आहे,मात्र सदर प्रकल्प बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचा विश्वास होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी दिला आहे.असे असले तरी ज्या ठिकाणी कोळसा पोहचविणे खर्चिक आहे तेथील संच पूर्ण क्षमतेने चालविणे शक्य नसल्याचेदेखील त्यांनी सांगितल्यामुळे एकलहरे प्रकल्प आहे त्याच स्थितीत राहणार की भविष्यात बंद होणार याविषयीचे प्रश्नचिन्ह कायम आहे.सध्या एकलहरे येथील औष्णिक केंद्रात दोनच संचांमधूनच वीज निर्मिती केली जात आहे. तर एक संच बंद अवस्थेत असल्यामुळे एकलहरे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प अखेरच्या घटका मोजत असल्याच्या धसक्याने कामगारांसह गावकरीदेखील धास्तावले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज