नाशिक द्राक्ष निर्यातीचे संभाव्य क्लस्टर : आर. रवींद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:29 IST2019-10-20T22:55:06+5:302019-10-21T00:29:34+5:30

नवीन कृषी निर्यात धोरणात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या फळांच्या संभाव्य निर्यात क्लस्टरच्या शक्यता पडताळण्याची प्रक्रिया सुरू असून, नाशिकमधील द्राक्ष निर्यातवाढीसाठी संभाव्य उत्पादन आणि निर्यात क्लस्टर्स म्हणून नाशिककडे पाहिले जात असल्याचे प्रतिपादन आपेडाचे उपमहाव्यवस्थापक आर. रवींद्र यांनी केले.

Potential Clusters of Nashik Grape Exports: | नाशिक द्राक्ष निर्यातीचे संभाव्य क्लस्टर : आर. रवींद्र

द्राक्ष निर्यात क्लस्टरविषयावरील चर्चासत्रात मार्गदर्शन करताना आपेडाचे उपमहाव्यवस्थापक आर. रवींद्र. व्यासपीठावर वैभव वाधवन, रवींद्र बोराडे, संतोष मंडलेचा आदी.

ठळक मुद्देमहाराष्ट्र चेंबर, एक्स्पोर्ट संघटनांचे संयुक्त चर्चासत्र उत्साहात

नाशिक : नवीन कृषी निर्यात धोरणात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या फळांच्या संभाव्य निर्यात क्लस्टरच्या शक्यता पडताळण्याची प्रक्रिया सुरू असून, नाशिकमधील द्राक्ष निर्यातवाढीसाठी संभाव्य उत्पादन आणि निर्यात क्लस्टर्स म्हणून नाशिककडे पाहिले जात असल्याचे प्रतिपादन आपेडाचे उपमहाव्यवस्थापक आर. रवींद्र यांनी केले.
फेडरेशन आॅफ एक्स्पोर्ट आॅर्गनायझेशन व महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर यांच्यातर्फे नाशिकमध्ये शुक्रवारी (दि.१८) द्राक्ष निर्यात क्लस्टरच्या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले. याप्रसंगी व्यासपीठावर एफआयईओचे सहायक संचालक वैभव वाधवन, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, महाराष्ट्र राज्य द्र्राक्षबागायतदार संघ-नाशिक विभागाचे अध्यक्ष रवींद्र बोरडे उपस्थित होते. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा म्हणाले, नाशिकमध्ये कांदा, द्राक्ष आणि डाळींब याचे उत्पादन चांगले होते त्यावर प्रक्रिया करून चांगले उत्पादन होऊ शकते. त्यासाठी क्लस्टर हा चांगला पर्याय असून, एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच एपीएमसी चार्जेस काढून टाकण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Web Title: Potential Clusters of Nashik Grape Exports:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.