शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

डाक सेवकांच्या संपामुळे टपाल बटवडा ठप्प

By admin | Updated: March 20, 2015 00:05 IST

डाक सेवकांच्या संपामुळे टपाल बटवडा ठप्प

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवकांचा संप सुरूच असून, त्यामुळे बटवड्यावर मोठा प्रतिकूल परिणाम झाला आहे. शेकडो पत्र पडून आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारकडे याबाबत चर्चा सुरू असून, लवकरच तोडगा निघण्याची शक्यता संप पुकारणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.जिल्ह्यात सुमारे साडेचारशे डाक सेवक असून, आॅल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियनने संप पुकारला आहे. त्यात बहुतांशी डाक सेवक सहभागी झाले आहेत. ग्रामीण डाक सेवकांना त्वरित खात्यात समाविष्ट करा, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर डाक सेवकांच्या वेतनात सुधारणा करण्यासाठी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करा, प्रस्तावित खासगीकरण थांबवा, उद्दिष्टपूर्तीसाठी कर्मचाऱ्यांना वेठीस धरू नका, अशा विविध मागण्यांसाठी १० मार्चपासून हे कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील टपालसेवा विस्कळीत झाली आहे. विशेषत: वीज, टेलिफोनसह अनेक देयके ग्राहकांपर्यंत पोहचली नाहीत, तसेच टपालाचा सर्व प्रकारचा भरणादेखील थांबला आहे. संघटनेचे नेते दिल्ली येथे टपाल सचिवांशी चर्चा करीत असून, आत्तापर्यंत दोन बैठका झाल्या; परंतु तोडगा निघू शकलेला नाही. जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप कायम राहील, असे संघटनेचे अध्यक्ष आर. एस. जाधव, सचिव सुनील जगताप, कोषागार कृष्णा गायकवाड यांनी कळविले आहे.