पोस्ट कार्यालयात ‘एैसी की तैसी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:15 IST2021-03-25T04:15:42+5:302021-03-25T04:15:42+5:30

पोलीस ठाण्यात दिव्याखाली अंधार अंबड पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार असलेल्या कक्षात बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये कुठलेही सुरक्षित अंतर ...

Post office 'Aisi Ki Taisi' | पोस्ट कार्यालयात ‘एैसी की तैसी’

पोस्ट कार्यालयात ‘एैसी की तैसी’

पोलीस ठाण्यात दिव्याखाली अंधार

अंबड पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार असलेल्या कक्षात बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये कुठलेही सुरक्षित अंतर पाळल्याचे दिसून आले नाही. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना देखील थेट प्रवेश देऊन जवळूनच विचारपूस केली जात होती. अंबड पोलीस ठाणे येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते, त्यांनीच कोरोनाच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधात्मक नियम न पाळणाऱ्यांवर पोलीसांकडूनच दंडात्मक कारवाई केली जाते.

---------

मनपा, वीज कार्यालयात उल्लंघन

मनपा सिडको विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांमध्ये सजगता दिसून आली असली तरी, विविध कर भरण्यासाठी येणारे नागरिक विना मास्क वावरत होते. तसाच प्रकार महावितरणच्या दत्त चौक येथील उपकेंद्रावर लाईट बिल भरणा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यामध्ये कोणतेही सुरक्षित अंतर पाळण्यात आले नाही.

Web Title: Post office 'Aisi Ki Taisi'