शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 10:26 PM

सायखेडा : कांद्याचे वाढते बाजारभाव लक्षात घेता येणाºया काही दिवसात कांद्याचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता असल्याने सायखेडा बाजार समितीच्या परिसरातील कांदा व्यापाºयांनी स्वत:च्या गुदामात कांदा साठवणुकीवर भर दिल्याने आगामी काळात शहरी भागात कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देवाढते बाजारभाव : व्यापाऱ्यांचा कांदा साठवणुकीवर भर

सायखेडा : कांद्याचे वाढते बाजारभाव लक्षात घेता येणाºया काही दिवसात कांद्याचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता असल्याने सायखेडा बाजार समितीच्या परिसरातील कांदा व्यापाºयांनी स्वत:च्या गुदामात कांदा साठवणुकीवर भर दिल्याने आगामी काळात शहरी भागात कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.मार्च महिन्यापासून कांद्याचे भाव गडगडले होते. ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल भावाने शेतकºयांनी कांदा विकला होता. जवळपास सात ते आठ महिने भाव ‘जैसे थे’ राहिल्याने शेतकरी पुरता रसातळाला गेला. आर्थिक नुकसान झाल्याने कांद्याचा खर्चसुद्धा फिटला नसल्याने शेतकºयांचे कर्ज वाढत गेले. यावेळी बाजारभाव नसल्याने अनेक शेतकºयांनी आपल्या घरच्या चाळीत कांदा साठवणूक केली. पाऊस कमी पडल्याने लाला कांद्याची लागवड कमी प्रमाणात झाली.अनेक व्यापारी मोठ्या प्रमाणात बाजार समितीत कांदा खरेदी करत असले तरी त्यांचा कांदा गाड्या भरून बाहेर जात नाही. शहरी भागातील नागरिकांना कांद्याची टंचाई निर्माण होऊन भाव वाढले की गुदामात साठवणूक केलेला कांदा चांगल्या भावात विक्र ी केला जाईल, अशी अशा आहे.काळ्या मातीत राबणाºया शेतकºयांना चार पैसे मिळण्याची वेळ आली की व्यापारी आणि शहरी भागातील ग्राहकांना त्रास होतो. आज शेतकरी रब्बीच्या हंगामासाठी भांडवल उपलब्ध व्हावे म्हणून जवळील कांदा विकत आहे आणि व्यापारी साठवणूक करून कृत्रिम टंचाई निर्माण करून काही दिवसात बाजारभाव वाढल्यावर लाखो रुपये नफा कमवणार शासन स्तरावर कांदा साठवणुकीवर बंधने आणून शेतकºयांना दिलासा देणार का, असा सवाल शेतकºयांकडून विचारला जात आहे.लाल कांदा विक्र ीसाठी मुबलक प्रमाणात नसल्याने उन्हाळा कांद्याचे भाव काही दिवसांपूर्वी २५०० रुपयांपर्यंत पोहचले होते. जेमतेम आठ दिवस बाजारभाव मिळाला, त्यानंतर पुन्हा १५०० रुपये सरासरी कांदा विक्र होत आहे.नवीन लाल कांदा बाजारात दाखल झाला तर जुन्या उन्हाळा कांद्याचे भाव कमी होतील, या भीतीने शेतकºयांनी कांदा विक्र ीसाठी आणत असले तरी व्यापाºयांना बाजारभाव पुन्हा वाढतील, अशी शक्यता असल्याने गुदामात कांदा साठवणूक करत आहे.