डांबरात पावडर भेसळ करणारे दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:00 AM2020-01-16T00:00:32+5:302020-01-16T00:29:47+5:30

महामार्गावरून डांबर घेऊन जाणाऱ्या टॅँकरचालकाकडून बेकायदेशीरपणे डांबर चोरून त्यात पांढरी पावडर भेसळ करत डांबराची गैरमार्गाने विल्हेवाट लावणाºया दोघा संशयितांना मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ३७ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे

In the possession of two cans of adulterant powder | डांबरात पावडर भेसळ करणारे दोघे ताब्यात

डांबरात पावडर भेसळ करणारे दोघे ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देमध्यवर्ती गुन्हे शाखा : ३७ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : महामार्गावरून डांबर घेऊन जाणाऱ्या टॅँकरचालकाकडून बेकायदेशीरपणे डांबर चोरून त्यात पांढरी पावडर भेसळ करत डांबराची गैरमार्गाने विल्हेवाट लावणाºया दोघा संशयितांना मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ३७ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील एका मोटार गॅरेजजवळ पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या या अवैधधंद्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या पथकाने छापा मारला. यावेळी संशयित मयूर वसंत सोनवणे-महाजन (३३, रा. गणेशवाडी, अमरधामरोड) व हरी बापू गाडे (२३. रा. सोनारी, जि. उस्मानाबाद) हे दोघे डांबरात भेसळ करताना आढळून आले. त्यातील गाडे हा टँकरचालक आहे.
भरलेल्या टँकरमधील डांबर काढून त्यात पावडरची भेसळ करून ठेकेदारांना डांबर पुरवठा करण्याचा प्रताप त्यांच्याकडून केला जात होता, असे तपासात पुढे आले आहे. घटनास्थळी हे दोघे संशयित भरलेल्या टँकरमधील डांबर रिकाम्या टँकरमध्ये टाकताना मिळून आले.

दोन टॅँकरसह बॉयलर टाकी व गॅस सिलिंडर हस्तगत
पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकून २० लाख रुपये व १५ लाख रुपये किमतीचे दोन टॅँकर, ७० हजार रुपयांचा लोखंडी बॉयलर, १ लाख रुपये किमतीची गोलाकार मोठी बॉयलर टाकी, इलेक्ट्रिक मोटार, गॅस सिलिंडर, १ लाख रुपये किमतीच्या पांढºया पावडरच्या ५०० गोण्या व १५ हजार रुपयांचे ५ लोखंडी ड्रम असा एकूण सुमारे ३७ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Web Title: In the possession of two cans of adulterant powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.