‘समृद्धी’ला विरोध करणारे ताब्यात

By Admin | Updated: March 28, 2017 02:08 IST2017-03-28T02:07:52+5:302017-03-28T02:08:06+5:30

घोटी : नागपूर - मुंबई प्रस्तावित समृद्धी महामार्गाला स्थानिक शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असूनही शासनाने पोलीस बंदोबस्तात या महामार्गाच्या मोजणीचे काम सुरू केले.

In possession of protest against 'Samrudhi' | ‘समृद्धी’ला विरोध करणारे ताब्यात

‘समृद्धी’ला विरोध करणारे ताब्यात

घोटी : नागपूर - मुंबई प्रस्तावित समृद्धी महामार्गाला स्थानिक  शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असूनही शासनाने पोलीस बंदोबस्तात या महामार्गाच्या मोजणीचे काम सुरू केले. आज घोटी परिसरात औचितवाडी - कांचनगाव शिवारात महामार्गाच्या जमिनीसाठी
मोजणी सुरू असताना महामार्गविरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी मोजणीस घटनास्थळी हरकत घेतली. मात्र प्रांताधिकारी व पोलीस  यंत्रणेने या शेतकऱ्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला. अखेर काही स्थानिक शेतकऱ्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ताब्यात घेतले. प्रांताधिकारी व तहसीलदार मोजणीस्थळी तळ ठोकून होते. गेल्या दोन दिवसांपासून नागपूर - मुंबई या प्रस्तावित महामार्गाच्या भूसंपादनासाठी इगतपुरी तालुका हद्दीत जमीन मोजणीचे काम सुरू झाले. धामणगाव, कवडदरा या परिसरात मोजणी करून, मोजणीचे पथक आज औचितवाडी, कांचनगाव या परिसरात जमीन मोजणीसाठी दाखल झाले. (वार्ताहर)
प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार अनिल पुरे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय घोगरे यांच्या नेतृत्वाखाली घोटीचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, इगतपुरी पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्यासह दोन महिला पोलीस अधिकारी व राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या असा जवळपास ७० ते ८० पोलीस कर्माचाऱ्यांचा फौज फाटा मोजणीसाठी घटनास्थळी तैनात होता.
महामार्ग विरोधी कृती समितीचे लक्ष्मण गव्हाणे, भास्कर गुंजाळ, अरु ण गायकर, दौलतराव दुभाषे आदिंसह कांचनगाव, औचितवाडी या शिवारातील शेतकऱ्यांनी या मोजणीस हरकत घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्या, असे आवाहन करून मोजणी बंद करण्याची विनंती केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी मोजणीस्थळी येऊन मोजणी बंद करण्याबाबत पोलिसांना विनंती केली. पोलीस अधिकारी घोगरे यांनीही शेतकऱ्यांची समजूत काढत तुम्ही शासन व लोकप्रतिनिधीशी संपर्क साधून दाद मागण्याचे नमूद केले. मात्र शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते. यावेळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी कृती समितीचे भास्कर गुंजाळ, अरु ण गायकर, दौलतराव दुभाषे, रामदास गव्हाणे, बंटी गव्हाणे, गोरख दुभाषे, हनुमान दुभाषे, गुरु नाथ दुभाषे, विजय कडू आदिंना पोलीस गाडीत बसवून ताब्यात घेतले.



 

Web Title: In possession of protest against 'Samrudhi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.