शहरात पॉझिटिव्हिटी रेट ३, मात्र ग्रामीणला ८ टक्क्यांवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:11 IST2021-06-01T04:11:47+5:302021-06-01T04:11:47+5:30
नाशिक : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या प्रारंभीच्या टप्प्यात दोन्हीवेळी शहराचा पॉझिटिव्हिटी रेट अधिक होता. मात्र, लाटेच्या प्रारंभीच्या तडाख्यानंतर ...

शहरात पॉझिटिव्हिटी रेट ३, मात्र ग्रामीणला ८ टक्क्यांवर !
नाशिक : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या प्रारंभीच्या टप्प्यात दोन्हीवेळी शहराचा पॉझिटिव्हिटी रेट अधिक होता. मात्र, लाटेच्या प्रारंभीच्या तडाख्यानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातच पॉझिटिव्हिटी रेट तसेच मृत्युदराचे प्रमाणदेखील अधिक असल्याचे दिसून येते. मे महिन्याच्या प्रारंभापासून नाशिक जिल्ह्यात देखील ग्रामीणचा पॉझिटिव्हिटी आणि मृत्युदर सातत्याने अधिक राहिला असून, मे महिन्याच्या अखेरीसही नाशिक शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्के, मात्र ग्रामीणचा पॉझिटिव्हिटी रेट अद्यापही ८.११ टक्क्यांवर आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांखाली असल्याने जिल्हा रेड झोनबाहेर आला असला तरी ग्रामीण भागातील पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्युदर अजून कमी होणे आवश्यक आहे. महानगरासह जिल्ह्यात १ जूनपासून निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी सर्व नागरिकांनी दक्षता बाळगण्याची नितांत गरज असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
नाशिक - २५ एप्रिल
एकूण बाधित गावे - ९४३
सक्रिय रुग्ण गावे - ४६८
२५ पेक्षा कमी सक्रिय रुग्ण असलेली गावे- २६३
२५ ते ५० रुग्ण असलेली गावे- १५५
५० ते १०० रुग्ण असलेली गावे - ३१
१०० पेक्षा अधिक रुग्ण असलेली गावे- १९
----------------------
नाशिक - १० मे
एकूण बाधित गावे - ४८१
सक्रिय रुग्ण गावे - २७७
२५ पेक्षा कमी सक्रिय रुग्ण असलेली गावे- १७०
२५ ते ५० रुग्ण असलेली गावे- ७८
५० ते १०० रुग्ण असलेली गावे - १७
१०० पेक्षा अधिक रुग्ण असलेली गावे- १२
---------
नाशिक - ३० मे
एकूण बाधित गावे - २४६
सक्रिय रुग्ण गावे - १८७
२५ पेक्षा कमी सक्रिय रुग्ण असलेली गावे- ९७
२५ ते ५० रुग्ण असलेली गावे- ६६
५० ते १०० रुग्ण असलेली गावे - १३
१०० पेक्षा अधिक रुग्ण असलेली गावे- ११
------------
एप्रिल महिन्याच्या तुलनेत जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मे अखेरीस रुग्णसंख्येत मोठी घट आली आहे. मात्र, शहराच्या तुलनेत अद्यापही ग्रामीण भागातील पॉझिटिव्हिटी रेट अधिक असल्याने नागरिकांनी अजूनही कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करण्याची नितांत आवश्यकता आहे.
डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी