शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सातपूर औद्योगिक वसाहतीत दुचाकीच्या धडकेत हमाल ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 01:50 IST

सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिकॉफ फ्लॅटेडजवळ चहा पिऊन रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीने दिलेल्या जोरदार धडकेत ४२ वर्षीय व्यक्ती जागेवर ठार झाल्याची घटना घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव रामचंद्र नानकू जांबेकर असून, तो हमालीचे काम करीत होता. त्याला धडक दिल्यानंतर अज्ञात दुचाकीचालक फरार झाला असून, सातपूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपूर : सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिकॉफ फ्लॅटेडजवळ चहा पिऊन रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीने दिलेल्या जोरदार धडकेत ४२ वर्षीय व्यक्ती जागेवर ठार झाल्याची घटना घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव रामचंद्र नानकू जांबेकर असून, तो हमालीचे काम करीत होता. त्याला धडक दिल्यानंतर अज्ञात दुचाकीचालक फरार झाला असून, सातपूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपूर एमआयडीसीमधील सिकॉफ फ्लॅटेड वसाहतीत एका कंपनीत सिमेंट गोण्या पोहोचविण्यासाठी गेलेला हमाल रामचंद्र नानकू जांबेकर (रा. मालधक्का रोड, देवळाली गाव) हा चालकाबरोबर चहा पिण्यासाठी टपरीवर गेला होता. चहा पिऊन रस्ता ओलांडत असताना महिंद्र अँड महिंद्र कंपनीकडे जाणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराने भरधाव दुचाकी चालवून जांभेकर यास जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, त्यात जांभेकर डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला. चालक विजय सिद्धार्थ घोडे यांनी औषधोपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत चालक विजय घोडे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, पोलीस उपनिरीक्षक सुखदेव काळे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघातDeathमृत्यू