शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावणेदोन लाख मतदारांची भर

By admin | Updated: August 1, 2014 01:10 IST

जिल्ह्यात पावणेदोन लाख मतदारांची भर

नाशिक पश्चिम आघाडीवर : अंतिम मतदार यादीनाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून जिल्'ातील मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली असून, लोकसभा निवडणुकीनंतर जवळपास एक लाख ८६ हजार मतदारांची नव्याने भर पडली आहे. येत्या दोन दिवसांत या मतदार याद्या केंद्रांवर मतदारांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार असून, मतदारांनी नावे असल्याची खात्री करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विलास पाटील व उपजिल्हा निवडणूक अधिकारी गीतांजली बाविस्कर यांनी प्रत्येक विधानसभानिहाय यादी जाहीर केली. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जी मतदार यादी वापरण्यात आली व त्यानंतर नव्याने मतदारांची नोंद झालेली आहे अशा मतदारांची ही अंतिम मतदार यादी असून, मतदार पुनरिक्षण मोहीम व निरंतर मतदान नोंदणी प्रक्रियेत जिल्'ात जवळपास एक लाख ९१ हजार ८९६ मतदारांनी नव्याने मतदार नोंदणीसाठी अर्ज सादर केले होते. त्यापैकी एक लाख ८६ हजार ३५३ मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आल्याने जिल्'ातील मतदारांची संख्या आता ४० लाख ६४ हजार ३३८ इतकी झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जिल्'ात ३८ लाख ७९ हजार ३७२ इतके मतदार होते. त्यात २० लाख ५५ हजार ४८८ पुरुष व १८ लाख २३ हजार ८३४ महिला मतदारांचा समावेश होता. ५० तृतीयपंथी मतदारांचीही नोंद करण्यात आली. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या या अंतिम मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना पुन्हा एकवार नावनोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तत्पूर्वी प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रनिहाय मतदार याद्या मतदारांना पाहण्यासाठी ठेवण्यात येतील. साधारणत: विधानसभा निवडणुकीपर्यंत नोंदणी करणाऱ्यांना मतदानाचा हक्क मिळू शकतो. (प्रतिनिधी)