नांदूरशिंगोटेत शिवार रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:16 IST2020-08-21T22:40:16+5:302020-08-22T01:16:27+5:30

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या सुमारास खड्डे दिसत नसल्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत. परिसरातील शिवार रस्त्यांचे मजबुतीकरण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Poor condition of Shivar roads in Nandurshingote | नांदूरशिंगोटेत शिवार रस्त्यांची दुरवस्था

नांदूरशिंगोटेत शिवार रस्त्यांची दुरवस्था

ठळक मुद्देबिकट वाट : चिखलातून मार्ग काढताना शेतकऱ्यांची कसरत

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या सुमारास खड्डे दिसत नसल्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत. परिसरातील शिवार रस्त्यांचे मजबुतीकरण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नांदूरशिंगोटे येथे व परिसरात गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून सतत पाऊस पडत असल्याने चिखलातून वाट काढताना शेतकºयांचे हाल होत आहेत. नांदूरशिंगोटे गावात येणाºया काही रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे; परंतु त्यापुढील रस्त्यांचे मजबुतीकरण झालेले नसल्याने शेतकºयांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतकºयांनी शेतात पिकविलेला शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणताना मोठी कसरत करावी लागत आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने अद्यापही शेतीशिवारात पाणी साचलेले असल्याने वावर उखळून गेले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी वाड्यावस्त्यांवर राहातात. शिवार रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे.

नांदूरशिंगोटे परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असून, २० ते २५ गावांचे केंद्रबिंदू असल्याने येथे व्यापारी व ग्राहकांची वर्दळ असते. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नांदूरशिंगोटे येथे उपबाजार आवार असल्याने दर शुक्रवारी व सोमवारी धान्य, भुसार व कांद्याचे लिलाव असतात. त्यामुळे शेतकºयांची गर्दी असते.
४शासकीय व निमशासकीय कार्यालय तसेच बँका व पतसंस्था, आठवडे बाजार, दवाखाना, शेती मॉल असल्याने शेतकरी व नागरिकांची खरेदी-विक्रीसाठी वर्दळ असते. वाडीवस्त्यांंवरील शिवार रस्ते नव्याने झाल्यास गावाच्या विकासात त्याची भर पडेल. आमदार माणिकराव कोकाटे यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

Web Title: Poor condition of Shivar roads in Nandurshingote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.