हरसूल जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:21 IST2020-08-23T22:15:22+5:302020-08-24T00:21:02+5:30
चांदवड : तालुक्यातील हरसूल येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या खोल्याची दुरवस्था झाली आहे.

हरसूल येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची झालेली पडझड.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : तालुक्यातील हरसूल येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या खोल्याची दुरवस्था झाली आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्यातरी भविष्यात केव्हाही शाळा सुरू होतील तेव्हा विद्यार्थ्यांनी बसायचे कोठे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. त्वरित नव्याने वर्गखोल्या बांधण्यात याव्यात, अशी मागणी माजी सरपंच शरद आहेर व ग्रामस्थांनी केली आहे. शाळेत केवळ एकच वर्गखोली सुुुस्थितीत असल्याची नोंद तीन वर्षांपासून असूनही नवीन वर्गखोली मंजूर झालेली नाही. उर्वरित दोन वर्गखोल्या धोकादायक स्थितीमध्ये आहे.
जोपर्यंत नवीन वर्गखोल्या बांधून मिळत नाही तोपर्यंत शाळा भरून दिली जाणार नाही तसेच मागणी मान्य न झाल्यास पंचायत समितीसमोर उपोषण करण्याचा इशारा पालकांनी व ग्रामस्थांनी दिला आहे.