डाळिंब उत्पादनाची ख्याती होतेय लुप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:25 IST2020-02-24T23:11:00+5:302020-02-25T00:25:45+5:30
दाभाडी : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होणारा बदल, आजाराचा प्रादुर्भाव यामुळे अनेक वर्षांपासून परिसराची डाळिंब उत्पादक म्हणून असलेली ख्याती ...

डाळिंब उत्पादनाची ख्याती होतेय लुप्त
दाभाडी : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होणारा बदल, आजाराचा प्रादुर्भाव यामुळे अनेक वर्षांपासून परिसराची डाळिंब उत्पादक म्हणून असलेली ख्याती लुप्त होऊ पाहत आहे. संपूर्ण भारतात डाळिंब उत्पादनाने दाभाडीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सातासमुद्रापार दाभाडीचे डाळिंब उत्पादनात नाव होते. सध्या डाळिंबाचे उत्पादन घटल्याने हा भाग आपली ओळख विसरतो की काय अशी भीती व्यक्त होत आहे.
दाभाडीत रोजगार नसल्याने स्थानिक मजुरांना उदरनिर्वाहासाठी बाहेरील राज्यात जावे लागत आहे. दाभाडीत एकेकाळी शेकडो मजूर कामाला येत. बाहेरून येऊन मजुरी करीत. मात्र आज तेथील भूमिपुत्रच मजुरीसाठी वणवण फिरताना दिसत असल्याची शोेकांतिका आहे.
पंचक्र ोशीतील शेतकऱ्याची प्रयोगशील शेतकरी अशी ओळख होती. नवनवीन प्रयोग करून यशस्वी होण्याची परंपरा येथील शेतकऱ्यांनी जपली आहे. ऊस, डाळिंब उत्पादन व प्रत टिकवण्यात येथील शेतकºयांचा हात कोणीच धरू शकत नाही. एकरी १०० टन उसाचे उत्पादन येथे काढण्यात आलेले आहे, तर डाळिंबमध्ये एकरी ५ लाखांपर्यंत उत्पादन घेतले आहे. त्यामुळे राज्यातून किंवा परराज्यातील अनेक व्यापारी मजूर येथे कामानिमित्त येत असत. काही तर येथे कायमचे रहिवासी झाले. स्वत:चे घरदार करून आपला संसार येथेच थाटला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणात होणारा बदल, लहरी निसर्ग व नानाविध आजारांचा प्रादुर्भाव यामुळे येथील डाळिंब शेती अखेरचा श्वास घेत आहे. त्याचा सरळ परिणाम दाभाडीच्या अर्थकारणावर झाला आहे. याचा मोठा फटका मजूर वर्गाला बसत आहे. तर डाळिंब उत्पादकांना कोणते पर्यायी पीक घ्यावे, याची चिंता सतावत आहे. येथील भूमिपुत्र डाळिंब पॅकिंगसाठी कधी संगमनेर तर कधी बारामती येथे जाताना दिसतो. आता तर थेट राजस्थान, गुजरातलाच पॅकिंग किंवा डाळिंब छाटणीच्या कामासाठी जात आहे. आता बॉक्सचा दाम ठरवून मजुरी मिळते. पंधरा-पंधरा दिवस गावापासून, घरापासून कामानिमित्त बाहेरगावी जावे लागत आहे. त्यामुळे पुन्हा दाभाडीत मोठ्या प्रमाणात डाळिंब लागवड होऊन या भागाला सुबत्ता कधी येईल अशी चिंता ग्रामस्थांना सतावत आहे.