नाशिक : ग्रामोदय माध्यमिक विद्यालयात पोलूशन वर सोलूशन उपक्रमातंर्गत विद्यार्थ्यांनी विविध चित्र रेखाटून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. विद्यार्थ्यांनी झाडांच्या तीन पानांवर 'कचरा जाळत नाही 'रू 5000/दंड आहे, 'कचरा घंटागाडीतच टाकतो', 'कचरा वर्गीकरण करतो' अशा प्रकारच्या स्वच्छतेवर आधारित प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठीच्या उपाययोजना सांगणारे घोषवाक्य लिहितांनाच प्रदुषणामुळे पर्यावरणाची होणारी हाणी आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा विपरीत परिणाम या विषयी जनजागृती केली. यावेळी विद्याथ्यार्ंनी त्यांच्या पालकांनाही आपल्या घरी व परिसरातील सर्व लोकांनीही तंतोतंत पाळव्यात अशी विनंती केली असून विद्यालयात विद्यार्थ्यांकडून याविषयावर आधारित एक प्रतिज्ञा म्हणून घेतली.विद्यार्थ्यांच्या चित्रकलेच्या या उपक्रमामुळे नाशिक शहरातील प्रदुषण रोखण्यास हातभार लागणार असून प्रदूषित शहरांमध्ये समावेश असलेल्या नाशकातील भावी पीढी अशा प्रकार पर्यावरण संवधर्नाचा विचार करून लागल्याने नाशिकचा पर्यावरण दृष्ट्या असलेला लौकिक व गतवैभव पुन्हा प्राप्त होण्यास योगदान मिळणार आहे. भारतातील महत्वाची नदी व महाराष्ट्राची गंगा म्हणून आज भारतभर गोदावरी नदी प्रचलित आहे. परंतु, सध्या गोदावरीलाही प्रदुषणाचे ग्रहण लागले आहे. त्याचा नदीकाठच्या अनेक गावांना फटका बसत आहे. नदीमध्ये शहरतील अनेक वस्त्यामधील सांडपाणी नदीपात्रात सोडल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे.नाशिक शहरात दररोज धावणाऱ्या वाहनांची संख्या साडेतीन लाखांच्या वर गेली आहे. दरवर्षी :वाहनांच्या संख्येत सातत्याने भर पडत असल्याने वायू प्रदूषणाची समस्या भेडसावू लागली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिक शहरही प्रदूषणाबाबत वरच्या स्थानावर आले आहे. शहर प्रदूषणमुक्त राहण्यासाठी दक्ष राहण्याचा संदेश या विद्यार्थ्यार्ंनी त्यांच्या चित्रकलेच्या माध्यमतून दिला असून नाशिकचे भावी नागरिक आतापासूनच प्रदुषणावर उपाय शोधू लाघल्याने स्वच्छ व सुंदर नाशिक शहराचा संकल्प लवकरच पूर्ण होईल, अशा विश्वास नाशिककरांकडून व्यक्त होत आहे.
नाशकातील विद्यार्थ्यांचे पर्यावरण संवर्धनासाठी 'पोलूशन वर सोलूशन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 16:18 IST
ग्रामोदय माध्यमिक विद्यालयात पोलूशन वर सोलूशन उपक्रमातंर्गत विद्यार्थ्यांनी विविध चित्र रेखाटून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. विद्यार्थ्यांनी झाडांच्या तीन पानांवर 'कचरा जाळत नाही 'रू 5000/दंड आहे, 'कचरा घंटागाडीतच टाकतो', 'कचरा वर्गीकरण करतो' अशा प्रकारच्या स्वच्छतेवर आधारित प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठीच्या उपाययोजना सांगणारे घोषवाक्य लिहितांनाच प्रदुषणामुळे पर्यावरणाची होणारी हाणी आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा विपरीत परिणाम या विषयी जनजागृती केली.
नाशकातील विद्यार्थ्यांचे पर्यावरण संवर्धनासाठी 'पोलूशन वर सोलूशन'
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे 'पोलूशन वर सोलूशन' पर्यावरण संवर्धनासाठी रेखाटले चित्र चित्रकलेच्या माध्यमातून केली जनजागृती