अस्ताणेत कोरानामुळे पोल्टी व्यवसाय संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 16:18 IST2020-03-06T16:17:47+5:302020-03-06T16:18:28+5:30

अस्ताणे : अस्ताणेसह परिसरात कोरोनाच्या दहशतीमुळे पोल्टी व्यवसाय धोक्यात आला असून पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात शेतीला जोड धंदा म्हणून केला जातो;

   Pollution business crisis due to low tide | अस्ताणेत कोरानामुळे पोल्टी व्यवसाय संकटात

अस्ताणेत कोरानामुळे पोल्टी व्यवसाय संकटात

अस्ताणे : अस्ताणेसह परिसरात कोरोनाच्या दहशतीमुळे पोल्टी व्यवसाय धोक्यात आला असून पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात शेतीला जोड धंदा म्हणून केला जातो; परंतु चायना या देशात कोराना हा आजार मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा परिणाम भारतातही कोंबडी व्यवसायावर झाला आहे. शहरास ग्रामीण भागातही मटन आणि चिकन खाण्यावर झाला आहे.
मालेगाव तालुक्यात पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतीला जोड धंदा म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते. कमी दिवसात कोंबडीचे उत्पन्न निघत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पोल्टी फार्म टाकले आहेत. ४० दिवसात माल तयार होऊन कंपनी घेउन जात असते; परंतु कोरोना आजारामुळे ग्राहक नसल्याने कंपन्याही माल उचलत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कोंबड्यांना ४० ते ४५ दिवसात घेऊन जाण्याची गरज असतांना ६० दिवस होउन ही कंपनी कोंबड्या घेण्यासाठी येत नसल्याने पोल्टी व्यवसाय डोकेदुखी ठरत आहे.

Web Title:    Pollution business crisis due to low tide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी