पंचवटीतील प्रभाग चारमध्ये पोटनिवडणूक होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:41 IST2021-02-05T05:41:32+5:302021-02-05T05:41:32+5:30
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चार अ या जागेवरील भाजप नगरसेविका शांताबाई हिरे यांचे २५ डिसेंबर २०१९ राेजी निधन झाले. त्यानंतर ...

पंचवटीतील प्रभाग चारमध्ये पोटनिवडणूक होणार
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चार अ या जागेवरील भाजप नगरसेविका शांताबाई हिरे यांचे २५ डिसेंबर २०१९ राेजी निधन झाले. त्यानंतर ही जागा रिक्त आहे. महापालिकेने यापूर्वी सातपूर प्रभागातील एका नगरसेवकाच्या निधनानंतर पोटनिवडणुकीसाठी पाठपुरावा केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने कानटोचले होते. त्यामुळे नाशिक महापालिकेने यंदा फारसा पाठपुरावा केला नव्हता. त्यानंतर कोरोनाचे महासंकट आल्यानंतर हा विषय मागे पडला होता. मात्र आता ही निवडणूक होत असून, मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १५ जानेवारी २०२१ रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. या यादीचे प्रभागनिहाय विभाजन तत्काळ करण्यात यावे, असे निवडणूक आयोगाने निर्देशीत केले आहे. प्रभागनिहाय मतदार यादी १६ फेब्रुवारीस घोषित करण्यात येईल. या यादीवर हरकती व सूचना १६ ते २३ फेब्रुवारीदरम्यान असतील. प्रभागनिहाय अंतिम यादी ३ मार्च रोजी प्रसिद्ध होईल. मतदान केंद्रांची यादी ८ मार्च रोजी, तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याची अंतिम तारीख १२ मार्च असेल. या निवडणुकीमुळे राजकीय हालचाली सुरू होणार आहेत.