तीन ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 13:03 IST2018-09-25T13:03:16+5:302018-09-25T13:03:37+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसुल, वायघोळपाडा व सापगाव या तिन ग्रामपंचायतींसाठी येत्या बुधवारी मतदान होत आहे.

तीन ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान !
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसुल, वायघोळपाडा व सापगाव या तिन ग्रामपंचायतींसाठी येत्या बुधवारी मतदान होत आहे. पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या दि. २६ सप्टेंबर रोजी होणार होत्या. पण महादेवनगर येथील निवडणुक बिनविरोध झाली. तर होलदारनगर येथे एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे या दोन ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रि या होणार नाही. त्यामुळे तहसिलदार कार्यालयात झालेल्या ईव्हीएम मशीनची सेटींग प्रक्रि या फक्त हरसुल, वायघोळपाडा व सापगाव या ग्रामपंचायतीं पुरतीच मर्यादित राहिली. या तिनही ग्रामपंचायतींसाठी येत्या बुधवारी निवडणुक होत आहे. त्यासाठी आज सकाळी ११ वाजता इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन (मतदान यंत्राची) सेटींग करु न इव्हीएम सील करण्यात आले. हे मतदान यंत्र सेटींग तयार झाल्यानंतर मतदानासाठी तयार झाल्यानंतरची खात्री उपस्थित प्रतिनिधींची झाल्यावरच मतदान यंत्र सील करण्यात आले. यावेळी सापगाव, वायघोळपाडा, हरसुल या तिनही ग्रामपंचायतींचे निवडणुक निर्णय अधिकारी, सहा.निवडणुक निर्णय अधिकारी, निवडणक कर्मचारी आदी उपस्थित होते. तर तिनही ठिकाणचे प्रतिनिधी उपस्थित होते. बुधवारी सकाळी ७.३० पासुन सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होणार आहे. तर दुस-याच दिवशी त्र्यंबकेश्वर तहसिलदार कार्यालयात निकाल जाहीर होतील.