पेठ तालुक्यात शांततेत मतदान
By Admin | Updated: April 17, 2016 22:36 IST2016-04-17T22:34:50+5:302016-04-17T22:36:51+5:30
प्रतिष्ठितांचे भवितव्य वोटिंग मशीनमध्ये बंद

पेठ तालुक्यात शांततेत मतदान
पेठ : तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील ३६ ग्रामपंचायतींचे मतदान शांततेत पार पडले. सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर मतदारांची हक्क बजावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. एप्रिल हिटमुळे दुपारी बारानंतर शांतता होती. जवळपास ८४ मतदान केंद्रांवर वोटिंग मशीनच्या साह्याने मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कैलास कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. अनेक प्रतिष्ठितांचे भवितव्य वोटिंग मशीनमध्ये बंद झाले.
तालुक्यातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रत्येक मतदान केंद्रावर चार मतदान अधिकारी व एक पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. मतदान शांततेत पार पडले.